आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाेराेनाव्हायरस या जागतिक महामारीचा सामना करत असतानाच हवामानही बदलत आहे. गुरुवारी उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकसह काही राज्यांत जाेरदार वाऱ्यासह पाऊस झाला. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले, देशाच्या विविध भागात वादळ, जाेरदार हवा, गडगडाटासह पाऊस पडत आहे. देशातल्या १२ पेक्षा जास्त राज्यांत तीन मेपर्यंत वादळासह पाऊस हाेण्याची शक्यता आहे.चक्रिवादळासंदर्भात ते म्हणाले की, दक्षिण अंदमान सागराच्या जवळच्या बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण हाेत आहे. जाे पुढील तासात डिप्रेशनमध्ये रुपांतरीत हाेईल. त्यानंतर त्याचे ५ मेपर्यंत वादळात रुपांतर हाेण्याची शक्यता नाही. सध्या ते म्यानमार व बांग्लादेशाच्या दिशेने सरकत आहे.
पूर्वोत्तरसह अनेक राज्यांत वाऱ्यासह पावसाचा अंदाज
अंदमान - निकाेबारमध्ये ५ मेपर्यंत मुसळधार पाऊस हाेण्याचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे. २ ते ३ मे दरम्यान जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, पूर्वोत्तर राज्य, आेदिशा, पश्चिम बंगालमध्ये वादळासह पाऊस हाेण्याची शक्यता आहे. ४ मे राेजी दिल्ली, हरियाणा, पंजाबमध्येही वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.