आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Raise The Retirement Age; EPFO Appealed, After 25 Years, 14 Crore Citizens Will Be Above 60 Years Of Age In The Country

आवाहन:सेवानिवृत्तीचे वय वाढवा; ईपीएफओने केले आवाहन, 25 वर्षांनंतर देशात 14 कोटी नागरिक 60 वर्षांवरचे असतील

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) खासगी आणि सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याची सूचना केली आहे. ज्येष्ठ नागरिकांची वाढती संख्या पाहता आगामी काळात पेन्शन फंडावर आणखी दबाव वाढेल, असे ईपीएफओचे म्हणणे आहे. ईपीएफओने व्हिजन २०४७ मध्ये निवृत्तीचे वय वाढवण्याची मागणी देशात आयुर्मान वाढण्याशी जोडली आहे. सरकारी व खासगी क्षेत्रात निवृत्तीचे वय ५८ ते ६५ वर्षे आहे.

वय वाढवल्यास तरुणांना तोटा, ज्येष्ठांना फायदा पेन्शन प्राधिकरणाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, निवृत्तीचे वय जास्त झाल्यावर पेन्शन फंडात कर्मचाऱ्यातर्फे जास्त रक्कम जमा होईल आणि त्याला चांगला लाभ दिला जाऊ शकेल. त्यामुळे मोठा निवृत्ती फंड तयार करण्यास मदत होईल. अर्थतज्ज्ञ के. आर. श्यामसुंदर म्हणाले की निवृत्तीचे वय वाढवल्याने जास्त वय असलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना नियमित उत्पन्न जास्त दिवस मिळू शकेल. तथापि, युवकांना नोकरीसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागेल.

बातम्या आणखी आहेत...