आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Raisina Dialogue 2021 Raisina Dialogue 2021 : PM Modi Will Inaugurate Today Through Video Conferencing; More Than 150 Speakers From 50 Countries Will Be Involved; News And Live Updates

रायसीना डायलॉग 2021:पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून करणार उदघाटन; यामध्ये 50 देशांतील 150 पेक्षा जास्त स्पीकर्स होणार सहभागी

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे रवांडाचे अध्यक्ष आणि डेनमार्कचे पंतप्रधान उपस्थित असतील.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज 'रायसीना संवाद'च्या 6 व्या आवृत्तीचे ऑनलाईन उदघाटन करणार आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता परराष्ट्र मंत्रालयाने हा कार्यक्रम व्हिडिओ कॉफ्रेंसिंगच्या माध्यमातून घेण्यात येणार असल्याचे सांगितले. हा कार्यक्रम आजपासून 16 एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे. याकरीता जगातील 50 पेक्षा जास्त देशातील 150 स्पीकर्स उपस्थित राहणार आहे. हा कार्यक्रम भारतीय पराराष्ट्र मंत्रालय आणि ऑर्ब्झव्हर रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जात आहे.

रवांडाचे राष्ट्रपती आणि डेनमार्कच्या पंतप्रधान प्रमुख पाहूणे
'रायसीना संवाद'चे एकून 50 सत्र होणार असून याचा थीम 'व्हायरल वर्ल्ड : आउटब्रेक्स आउटलायर्स अँड आउट ऑफ कंट्रोल' (Viral World: Outbreaks, Outliers and Out of Control)आहे. यामध्ये जगातील प्रमुख 50 देशातील 150 स्पीकर्स उपस्थित असणार आहे. याची सुरवात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उदघाटनच्या माध्यमातून करतील. या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे रवांडाचे अध्यक्ष आणि डेनमार्कचे पंतप्रधान उपस्थित असतील.

त्यानंतर होणाऱ्या सत्रांत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल सहभागी होतील. यावितिरिक्त पोर्तुगाल, मालदीव, जपान आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांसह बरेच नेते व अधिकारी या संवादात भाग घेतील.

काय आहे 'रायसीना डायलॉग'?
'रायसीना डायलॉग' हे विविध देशांतील लोकांचे एक व्यासपीठ आहे. यामध्ये जगभरातील परिस्थिती आणि आव्हाने या विषयावर अर्थपूर्ण चर्चा केली जाते. याची सुरुवात केंद्र सरकारने 2016 मध्ये केली होती. त्यानंतर सतत हा संवाद सत्र आयोजित केला जातो.

या देशातील पराराष्ट्रमंत्री होणार सहभागी
यामध्ये प्रमुख पाहूणे व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री मरीसे पायने आण‍ि फ्रांसचे परराष्ट्रमंत्री जीन वेस ली ड्रायनसह पोर्तुगाल, स्लोव्हेनिया, रोमानिया, सिंगापूर, नायजेरिया, जपान, इटली, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, केनिया, चिली, मालदीव, इराण, कतार आणि भूतानचे पराराष्ट्रमंत्रीही यात सहभागी होतील.

बातम्या आणखी आहेत...