आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारायसीना डायलॉगचे 8 वे पर्व आजपासून दिल्लीत सुरू होणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या आहेत. गुरुवारी दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली.
मोदी सर्वात आवडीचे नेते, मोदी हसले
पत्रकार परिषदेत मेलोनी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात आवडते नेते आहेत. ते किती मोठे नेते आहेत, हे जगभरात सिद्ध झालेले आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. ही प्रशंसा ऐकून दुसऱ्या व्यासपीठावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हसताना दिसले. मोदींनी भारत आणि इटलीदरम्यानच्या स्टार्टअप संदर्भातील घोषणा केली.
आजपासून राजकीयसोबतच संरक्षण संबंध
PM मोदी म्हणाले- आमच्यात 75 वर्षांपासून राजनैतिक संबंध आहेत. पण आजपर्यंत संरक्षण संबंध नव्हते. आज आपण याचीही सुरुवात करत आहोत. याशिवाय नवीकरणीय ऊर्जा, हायड्रोजन, IT, TV, सेमीकंडक्टर आणि अंतराळ या विषयांवर दोन्ही देश एकत्र काम करतील. इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली.
तीन दिवसीय असणार रायसीना डायलॉग
तीन दिवसीय हा (2-4 मार्च) संवाद कार्यक्रम चालेल. यामध्ये 100 देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. आज सायंकाळी साडेसहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे. विशेष बाब म्हणजे रायसीना संवाद अशा वेळी होत आहे. जेव्हा भारत G-20 चे अध्यक्षपद व यजमान आहे. त्यामुळे ती महत्त्वाची बाब मानली जात आहे.
यावर्षी 100 हून अधिक देश सहभागी होणार
परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रायसीना संवाद 2023 मध्ये 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील. यामध्ये मंत्री व माजी राज्य व सरकार आणि सरकार प्रमुख, लष्करी कमांडर, उद्योगांचे प्रमुख, तंत्रज्ञान नेते, धोरणात्मक घडामोडींचे तज्ञ, शैक्षणिक, पत्रकार, धोरणात्मक व्यवहार तज्ञांचा समावेश आहे.
हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या सहकार्याने परराष्ट्र मंत्रालयाने आयोजित केले आहे. गेल्या आठ वर्षांत रायसीना संवादाचा प्रभाव वेगवेगळ्या क्षेत्रात सातत्याने वाढत आहे. तसेच, या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक प्रमुख जागतिक परिषद म्हणून मान्यता मिळाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.