आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोकसभेच्या निवडणूकावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली आता त्यांनी तिकडची अर्थात भाजपकडून सुपारी घेतली असा खळबळजनक खुलासा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नाशिक येथे केला.
अजित पवार नाशिक दौऱ्यावर आहेत. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला उपस्थिती त्यांनी लावली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी हे वक्तव्य केले.
राज ठाकरेंवर टीका करताना अजित पवार म्हणाले की, राज ठाकरे सांयकाळच्या वेळी सभा घेतात ते उन्हात सभा घेत नाहीत. शरद पवारांनी काय बोलावे हे तेच ठरवतील राज ठाकरेंनी यावर बोलुन फायदा नाही. राज ठाकरेंनी पुर्वीचीच कॅसेट लावली आहे असा टोलाही त्यांनी लगावला.
राज यांच्या बोलण्याला अर्थ नाही
शरद पवारांची राजकीय कारकिर्द सर्वांसमोर आहे. आता कुणी काहीही बोलत असतील तर त्यांच्या बोलण्याला काहीही अर्थ नाही. माध्यमांतही अशा बातम्या लगेचच ब्रेकींग म्हणून येतात असेही अजित पवार म्हणाले.
मनसे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूकावेळी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. व्हिडिओ आणि पुराव्यांसह त्यांनी भाजपची पोलखोलही केली होती. ठाकरे यांनी महाराष्ट्रभर सभांचे सत्र घेतल्यानंतर राज्यात भाजपविरोधी काहीसे वातावरण दिसून आले होते. यानंतर राज ठाकरे यांनी आपला पावित्रा बदलून महाविकास आघाडी सरकार, राष्ट्रवादी आणि शरद पवारांना सातत्याने लक्ष्य केले आहे. राज यांना भाजपचे पाठबळ असल्याचाही आरोप होत आहे. हाच धागा पकडून अजित पवार यांनी राज ठाकरेंवर टीका करीत भाजपची आता सुपारी घेतल्याचे म्हटले आहे.
हुकुमशाही चालणार नाही
राज ठाकरे कोणत्या काळात भाषण करतात त्यावर त्यांचा सुर अवलंबुन असतो असेही पवार म्हणाले. राज्यात अल्टीमेटम देताच येणार नाही. हे कायद्याचे राज्य आहे येथे हुकुमशाही करता येणार नाही. खुद्द अजित पवार असले तरीही हुकुमशाही करता येणार नाही.
राज यांचे मतपरिवर्तन झाले
लोकसभा निवडणूका काळातील भाषणे भाजपच्या विरोधात होती. त्यानंतर त्यांचे मतपरिवर्तन झाले, त्यानंतर ते राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीवर टीका करीत आहेत असेही अजित पवार यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.