आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज यांचे नाव खोडले:भोंग्याच्या वक्तव्यावरून पुण्यात पडसाद, कोंढाव्यातील कोनशिलेवरील राज ठाकरेंच्या नावाला फासले काळे!

पूणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मशिदीवरील भोंगे काढण्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरे चांगलेच अडचणीत येताना दिसत आहे. या मुद्द्यावरून टीकेचे धनी झालेल्या राज ठाकरे यांना पुणे येथील त्यांच्याच शहराध्यक्षांकडून घरचा आहेर मिळाला. त्यानंतर पुणे येथे कोंढाव्यातील कब्रस्थानातील उद्धघाटनावेळीच्या कोनशिलेवरील राज ठाकरे यांचे नाव खोडण्यात आले असून त्याला काळे फासण्यात आले आहे. या कोनशिलेचे अनावरण राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. या कृत्यावरून त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे मुस्लिम समाजात पडसाद दिसून आले आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये हिंदुत्वाची भूमिका मांडली. यावेळेस त्यांनी मशिदींवरील भोंग्यांना विरोध करण्याची भूमिका मांडली.

राज यांच्या या भूमिकेनंतर पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर पुण्यातील मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनीही आपण वॉर्डमध्ये शांतता राखण्याला प्राधान्य देण्याची भूमिका घेतली. त्यानंतर कोंढवा येथे राज ठाकरे यांनी उद्धाटन केलेल्या एका कब्रस्तानामधील कोनशिलेवरील त्यांचे नाव काढून टाकण्यात आले.

कोंढवा येथील नुराणी कब्रस्तानमधील विकास कामाचे 2013 ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले होते. मात्र राज ठाकरे यांनी आता घेतलेल्या राजकीय भूमिकेमुळे मुस्लीम समाजात पडसाद पडत आहेत. कब्रस्तानामधील विकासकामांच्या उद्घाटन कोनशिलेवरील राज यांच्या नावाला काळे फासण्यात आले आहे.

राज ठाकरे देणार ठाण्याच्या सभेत उत्तर

गुढीपाडव्याच्या सभेनंतर राज ठाकरे यांच्यावर टीका झाली. त्यांच्या वक्तव्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. या टीकेला राज ठाकरे ९ एप्रिल रोजी ठाण्यातील जाहीर सभेमध्ये उत्तर देणार असल्याचे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले होते वसंत मोरे

“मी स्पष्ट करतो की माझी राज ठाकरे किंवा पक्षावर कुठलीही नाराजी नाही. पण राजसाहेबांचे भाषण आमच्या कार्यकर्त्यांना कळलेच नाही,” राज ठाकरेंनी भोंगे काढण्याबाबत सुचना दिल्या त्याची आम्ही अमलबजावणी करणार नाही. आम्ही आमच्या प्रभागांमध्ये भोंगे न लावता शांतता राखण्याला प्राधान्य देणार असल्याचे वसंत मोरेंनी स्पष्टपणे सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...