आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज ठाकरे यांनी आज जो अल्टीमेटम दिला तो मुस्लिम समाजाला नाही तर महाराष्ट्र सरकारला दिला. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहमंत्रीपद आहे त्यामुळे राज ठाकरे यांनी त्यांना आव्हान दिले आहे. राज जे बोलत होते ती महाराष्ट्राची संस्कृती कधीही नव्हती असा टोला औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी लगावला.
इम्तियाज जलील म्हणाले, राज ठाकरे यांनी चार मे रोजी सरकारला अल्टीमेटम दिला. पण मी म्हणेल की तुम्ही तुमच्यावर केसेस लावून घ्या, मशिदीसमोर तुम्ही भोंगा वाजवा मी अयोद्ध्याला जात आहे अशी मिश्किल टीकाही त्यांनी केली.
राज ठाकरे मुळ प्रश्नांना बगल देत आहेत
आज युवा पिढी त्रस्त आहे. रोजगाराचा प्रश्न महत्वाचा आहे, त्यांना मार्गदर्शन देण्याची गरज आहे. हे राज यांनी करायला हवे होते. भाषण ऐकल्यानंतर सियासत कि दुकानो मे जरूरी है मुल्क मेरा जलता है असे मला वाटले असेही इम्तियाज जलील म्हणाले.
राज भाजपच्या इशाऱ्यावर चालत आहेत
राज ठाकरे भाजपच्या इशारावर चालत आहेत. रिमोट कंट्रोलद्वारे भाजप हे सर्व चालवित आहे. भाजपचेही राज्यात सरकार होते पण त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही असे म्हणत इम्तियाज जलील यांनी ''सियासत नफरतोकी जख्म को भरणेही नही देती जब भी घर मे आता है जख्म वहा मख्खी बैठ जाती है अशा शब्दात मत व्यक्त करीत इम्तियाज जलील यांनी आपली वेगळी भूमिका विषद केली.
आज महाराष्ट्रात सर्व सुरळीत आहोत. एक वर्षासाठी आपण कशासाठी भांडत होतो. कोविडविरुद्ध लढत होतो, एक ऑक्सिजन बेड मिळाला तर जग मिळाल्यासारखे वाटत होते. राजनैतिक मतभेद असतील तर ते असु दे पण आजची स्थिती काय हे पाहा आणि बोलो
मुस्लिम समाज भूमिका घेणार नाही
अल्लाऊद्दीन खिलजीने काय केले हा इतिहास होता, जे चुकीचे झाले ते झाले. आज राज ठाकरे जे ही म्हणाले त्यात मुस्लिम समाज कोणतीही भूमिका घेणार नाही, तो राज्य सरकार आणि पोलिसांचा प्रश्न आहे. भोंग्याचा निर्णय न्यायालयातच होत असतो त्याचा निर्णय रस्त्यावर होत नसतो हेही इ्म्तियाज जलील म्हणाले.
अशी महाराष्ट्राची संस्कृती कधीही नव्हती
इम्तियाज जलील म्हणाले, दुर्दैव हे की राज जे बोलत आहे ही महाराष्ट्राची संस्कृती कधीही नव्हती. मुस्लिम समाज राज ठाकरेंच्या वक्तव्यांचा विरोध करणार नाही. आम्ही राज यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रियाही देणार नाही असेही ते म्हणाले.
आम्ही राजसारखे बोललो असतो तर गुन्हे नोंदवले असते
हा देश राजा, महाराजांचा नाही. हे लोकशाहीचे राज्य आहे. तुम्ही उठाल आणि काहीही बोलणार हे योग्य नाही पण आम्ही बोललो असतो तर आमच्यावर गुन्हे दाखल केले असते. छोट्या प्रकरणात माझ्यावर 12 गुन्हे दाखल केले आहेत.
राज यांचा इशारा समजला पण सरकारला समजायला हवा
राज ठाकरे म्हणाले ''भोंग्याबाबत विनंती करूनही समजत नसतील तर एकदा होऊ द्या'' असे राज म्हणाले हे मला आणि जनतेलाही कळते पण हे सरकारला कळायला हवे. आज राज जे बोलत आहेत तसे आम्हीही बोलु शकतो पण आम्ही बोलणार आहे. मुळात हे सर्व सरकार बघेल. आज राज जे बोलत आहेत तसे आम्हीही बोलु शकतो पण आम्ही बोलणार नाही. मुळात हे सर्व सरकार बघेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.