आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येसाठी तयार राहा, असे प्रक्षोभक विधान मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते राजा पटेरिया यांनी केले आहे. त्यांचा यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात ते आपल्या कार्यकर्त्यांना चिथावणी देत असल्याचे दिसून येत आहे.
पटेरिया कार्यकर्त्यांपुढे बोलताना म्हणाले - मोदी निवडणूक पद्धत संपुष्टात आणतील. धर्म, जाती भाषेच्या आधारावर देशात फूट पाडतील. त्यांच्यामुळे दलित, आदिवासी व अल्पसंख्यकांचे जीवन संकटात सापडले आहे. संविधान वाचवायचे असेल तर मोदींच्या हत्येसाठी तयार राहा. हत्या म्हणजे त्यांना पराभूत करणे आहे. त्यांचा हा व्हायरल व्हिडिओ पन्ना जिल्ह्यातील पवईचा असल्याचे सांगितले जात आहे.
पटेरिया म्हणाले - विधानाचा विपर्यास झाला
वादग्रस्त व्हिडिओ उजेडात आल्यानंतर माजी मंत्री राजा पटेरिया यांनी आणखी एक व्हिडिओ जारी करून आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले - व्हायरल झालेला व्हिडिओ कार्ड वितरणाच्या काळातील आहे. त्यातील मोदींच्या हत्येसंबंधीच्या विधानाचा विपर्यास करण्यात येत आहे. मी गांधींना मानणारा व्यक्ती आहे. मी अशा प्रकारचे विधान करू शकत नाही.
पटेरिया पुढे म्हणाले - माझा म्हणण्याचा अर्थ राजकीय दृष्टिकोनातून होता. संविधान वाचवण्यासाठी मोदींना हरवणे गरजेचे आहे. अल्पसंख्यक, दलित व आदिवासींच्या संरक्षणासाठी बेरोजगारी दूर करण्यासाठी त्यांना पराभूत करणे आवश्यक आहे. पण माझे विधान अत्यंत चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले.
गृहमंत्री म्हणाले - ही महात्मा गांधींची नव्हे इटलीची काँग्रेस
गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी काँग्रेस नेते राजा पटेरिया यांच्या विधानावर FIR दाखल करण्याचे निर्देश दिलेत. ते म्हणाले - पटेरियांचे विधान मी ऐकले. त्यावरून ही काँग्रेस महात्मा गांधींची नव्हे तर इटलीचे असल्याचे स्पष्ट होते. इटलीची मानसिकता मुसोलिनीची आहे. राहुल गांधी यांच्या यात्रेत स्वरा भास्कर, कन्हैया कुमार, सुशांत सिंह चालत आहेत. यावरूनही हे स्पष्ट होते.
BJP प्रदेशाध्यक्षांनी केली चौकशीची मागणी
भाजप प्रदेशाध्यक्ष व्ही डी शर्मा यांनीही या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. ते एका ट्विटमध्ये म्हणाले - माजी मंत्री राजा पटेरिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येसाठी जनता व काँग्रेस कार्यकर्त्यांना चिथावणी देणे अत्यंत गंभीर व निंदणीय गोष्ट आहे. राहुल गांधी यांच्या मध्य प्रदेशातून गेलेल्या भारत तोडो यात्रेत यासंबंधीचे कट कारस्थान रचले गेले काय? याचा तपास केला गेला पाहिजे.
यापूर्वीही केले वादग्रस्त विधान
जवळपास 10 महिन्यांपूर्वीही राजा पटेरिया यांनी एक वादग्रस्त विधान केले होते. तेव्हा ते दमोहच्या रैपुरा ठाण्याच्या प्रभारींशी म्हणाले होते - 2005 पूर्वीपासून या भागातील जमिनीवर कब्जा करणाऱ्या आदिवासींची त्यांच्या जमिनीवरून हकालपट्टी करणे चुकीची आहे. अशा प्रकारे आदिवासींना त्रास देणे, त्यांच्या महिलांशी मारहाण करणे कायद्याने चुकीचे आहे. संसदेतही यासंबंधीचा एक कायदा पारित करण्यात आला आहे. आदिवासींना न्याय मिळाला नाही तर आम्हाला मजबुरीने शस्त्र हाती घ्यावे लागतील. -------------------------------
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.