आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी धून:भारतात पाश्चिमात्य रॅप संगीताची जादू पसरवतील राजाकुमारी

अलिशा हरिदासानी- गुप्ता6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

३६ वर्षीय राजाकुमारी यांनी अमेरिकेत गीत लेखिका आणि रॅपर (गाण्याची पाश्चात्त्य शैली) म्हणून ओळख निर्माण केली आहे. त्यांचे मूळ गाव अमेरिकेतील क्लेरेमोंट, कॅलिफोर्निया आहे, परंतु त्या सध्या मुंबईत राहतात. त्या इंग्रजी, हिंदी मिश्रित गाणी गातात. रॅपची धून भारतीय शास्त्रीय संगीताशी जुळवतात. राजाकुमारी यांनी गेल्या वर्षी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यासाठी एका आशियाई-अमेरिकन मैफलीत एनआरआय हे गाणे सादर केले होते.

राजाकुमारी यांनी वयाच्या सहाव्या वर्षी नृत्य आणि गायन सुरू केले होते. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी भारतातील विविध शहरांमध्ये भारतीय नृत्याचे कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली. वयाच्या विसाव्या वर्षानंतर त्यांनी स्वतःची गाणी लिहिणे आणि रेकॉर्ड करणे सुरू केले. राजाकुमारी यांनी लॉस एंजलिसमधील संगीत निर्माता आणि प्रकाशक पल्स यांच्याशी करार केला. त्यांनी पल्समधील ग्वेन स्टेफनी आणि इगी अझालीसाठी गाणी लिहिली आहेत.

अझालीच्या म्युझिक व्हिडिओंनी त्यांना स्वतःचे व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा दिली. त्या म्हणतात की, या व्हिडिओने माझी झोप उडवली. लोकांना माझा आवाज सोबत हवा होता, पण दक्षिण आशियातील एका महिलेने एकटीने ते करू नये, असे त्यांना वाटत होते. मग मी विचार केला की, मी हे का करू शकत नाही? राजाकुमारी यांचे खरे नाव श्वेता येलाप्रगदा राव आहे. त्यांनी त्यांचा मेड इन इंडिया हा सिंगल व्हिडिओ या वर्षी मेमध्ये रिलीज केला. हे १९९० च्या दशकातील हिट बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या भारतीय पॉप गाण्याचे रिमिक्स आहे. त्यांचे आणखी एक व्हिडिओ गाणे एमएस मार्व्हल या डिस्ने प्लसच्या नवीन मालिकेत दाखवले आहे.

ग्रॅमी पुरस्काराचे स्वप्न राजाकुमारी सांगतात, अनेक वर्षे पाश्चिमात्य संगीतावर काम केल्यानंतर आता मला स्वत:च्या पायावर उभे राहायचे आहे. त्यांनी गॉडमदर हे लेबल लाँच केले आहे. त्या म्हणतात, भारतातील उदयोन्मुख प्रतिभेला पुढे नेण्याचा माझा उद्देश आहे. ग्रॅमी म्युझिक अवॉर्ड जिंकणारी मुलगी भारतात शोधण्याचे माझे स्वप्न आहे. हे एक मोठे यश असेल.

बातम्या आणखी आहेत...