आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rajastan Lockdown: In State For 24 May Lockdown; Who Leave The House Unnecessarily Will Be Quarantined; News And Live Updates

राजस्थानमध्ये 24 मे पर्यंत लॉकडाऊन:पहिल्यांदाच नवीन प्रकरणांपेक्षा रिकव्हरी जास्त; सार्वजनिक-खासगी वाहतूक बंद, अनावश्यकपणे बाहेर पडल्यास केले जाणार क्वारंटाइन

जयपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजस्थानमध्ये आतापर्यंत 7.38 लाख लोक कोरोना महामारीच्या विळाख्यात आले आहे

देशासह राजस्थान राज्यातही कोरोना महामारीचा प्रार्दुभाव वाढत आहे. परंतु, राजस्थानमध्ये पहिल्यांदा नवीन प्रकरणांपेक्षा रिकव्हर होणार्‍यांची संख्या वाढली आहे. दरम्यान, राज्यातील जवळपास 15 जिल्ह्यांत ही परिस्थिती पाहायला मिळाली आहे. तरीदेखील राजस्थान सरकारने 24 मे पर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद असणार आहे. राज्यात उद्या सोमवार सकाळी 5 वाजेपासून 24 मे पर्यंत कडक निर्बंध असून यात सार्वजनिक-खाजगी वाहतूकही बंद असणार आहे. तसेच या लॉकडाऊनदरम्यान कोणीही अनवाश्यकपणे बाहेर पडल्यास त्याला पोलिसांकडून क्वारंटाइन केले जाणार आहे.

राजस्थानमधील 15 जिल्ह्यात रिकव्हरी रेट जास्त
राजस्थानमध्ये आतापर्यंत 7.38 लाख लोक कोरोना महामारीच्या विळाख्यात आले असून यामधील 5.33 लाख लोक रिकव्हर झाले आहे. राज्यात सक्रीय रुग्णांचा आकडा 1.99 लाख आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत राज्यात 17 हजार 987 नवीन प्रकरणे समोर आले असून यामधील 17 हजार 667 लोक बरे झाले आहे. विशेष म्हणजे राज्यातील 15 जिल्ह्यांत नवीन रुग्णांपेक्षा रिकव्हर होणार्‍या लोकांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...