आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयपूर:देशातील अशी पहिलीच हत्या, 10 दिवस आधी वाहनात जीपीएस लावून नंतर हत्या

जयपूर / राजेंद्र गाैतम, उदय चाैधरी7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजस्थानच्या हिस्ट्रीशीटरच्या हत्येचे गूढ उकलले

राजस्थानच्या जयपूरमध्ये बनीपार्क भागात २० दिवसांपूर्वी हिस्ट्रीशीटर अजय यादवची हत्या झाली हाेती. परंतु त्याच्या दहा दिवस आधी मारेकऱ्यांनी त्याच्या वाहनात जीपीएस लावले हाेते. त्यानंतर मारेकरी त्याचा सातत्याने पाठलाग करत हाेते. २१ सप्टेंबर राेजी बनीपार्क जवळ दिवसाढवळ्या गाेळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर जीपीएस काढून ते घेऊन गेले. देशात जीपीएसचा हत्येसाठी अशा प्रकारे वापर झाल्याची ही पहिलीच घटना असावी. आराेपींनी जीपीएस डिव्हाइस देखील घटनेच्या महिनाभरापूर्वी आॅनलाइन खरेदी केले हाेते. साेबतच जीपीएसला अजय यादवच्या नावे अॅक्टिव्हेट केले. परंतु अॅक्टिव्हेट करणाऱ्या आराेपीने माेबाइल क्रमांक स्वत:चा दिला. म्हणजे जीपीएस लाेकशन स्वत:ला मिळत राहील, असा त्यामागील उद्देश हाेता.

त्यामुळे षड्यंत्र..
२०१५ मध्ये गगन पंडितवर झालेल्या गाेळीबारात अजय यादवचे नाव समाेर आले हाेते. तेव्हा ताे अजमेरमध्ये मुकेश यादवकडे गेला. तेथे दाेघांमध्ये तू तू-मैं मैं झाली. मुकेश वैशालीनगर पाेलिस ठाण्याचा हिस्ट्रीशीटर आहे. नंतर पाेलिसांनी अजयला अटक केली आणि त्याची तुरुंगात रवानगी केली. काही कालावधीनंतर ताे बाहेर आला. त्यानंतर दाेघांतील शत्रुत्व आणखी वाढले. तेव्हा मुकेशने झाेटवाडाचा हिस्ट्रीशीटर प्रदीप यादवची मदत घेण्यासाठी त्याच्याकडे गेला. विवाहाचा एक फाेटाे व्हायरल झाल्याच्या तीन दिवसांनंतर प्रदीपवर गाेळीबार झाला. त्यामुळे प्रदीप पॅरालाइज्ड झाला. प्रदीपने हल्ल्यामागे अजय असल्याचा आराेप केला हाेता.

बातम्या आणखी आहेत...