आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rajasthan | Ashok Gahlot | Cabinet Reshuffle In Gehlot Government In Rajasthan; Today 15 Ministers Will Be Sworn In. The Swearing In Ceremony Will Be Held At Raj Bhavan At 4 Pm

मंत्रिमंडळ फेरबदल:राजस्थानामध्ये गहलोत सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल; आज 15 मंत्री घेणार शपथ, दुपारी चार वाजता राजभवनात शपथविधी सोहळा पार पडणार

नवी दिल्ली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानमध्ये आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. राजस्थानमध्ये, अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात फेरबदलाचा सत्र सुरू झाले असून, 15 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये 11 कॅबिनेट तर चार राज्यमंत्री असतील.

आज दुपारी चार वाजता राजभवनात शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हेमाराम चौधरी, महेंद्रजित मालवीय, रामलाल जाट, महेश जोशी, विश्वेंद्र सिंह, रमेश मीना, ममता भूपेश, भजनलाल जाटव, टिकाराम जुली, गोविंद राम मेघवाल आणि शकुंतला रावत यांना कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ दिली जाईल.

त्याचवेळी आमदार जाहिदा खान, ब्रिजेंद्र ओला, राजेंद्र गुढा आणि मुरारीलाल मीना हे राज्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या यादीत सचिन पायलट यांचे समर्थक हेमाराम चौधरी, रमेश मीना, मुरारीलाल मीना आणि ब्रिजेंद्र ओला यांची नावे आहेत. त्याचवेळी, बहुजन समाज पक्षातून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या सहा आमदारांपैकी राजेंद्र गुढा यांनाही मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे.

गेल्या वर्षी तत्कालीन उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह विश्वेंद्र सिंह आणि रमेश मीणा यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाविरोधात बंडखोर भूमिका घेतल्याने त्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले होते. यापैकी विश्वेंद्र सिंह, रमेश मीणा यांच्या नावाचा शपथविधी होणाऱ्या मंत्र्यांच्या यादीत समावेश आहे.

2023 मध्ये होणार निवडणूक
राजस्थानमध्ये 2023 मध्ये निवडणुका पार पडणार आहेत. गेहलोत आणि पायलट गटात सुरू असलेली भांडणे ज्या मर्यादेपर्यंत पोहोचली आहेत. त्यामुळे काँग्रेस आता फेरबदलाचा विचार करताना पाहायला मिळत आहे. पंजाबमध्ये देखील काँग्रेसने फेरबदल केले आहे.

दिल्लीतून फोन आल्यानंतर राजीनामे घेण्यात आले
राजस्थान राज्याचे प्रभारी अजय माकन यांनी शुक्रवारी रात्री राजीनामे स्वीकारले जावेत, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर संध्याकाळीच तिन्ही मंत्र्यांनी राजीनामे पाठवले होते, त्यासाठी तिघांनाही दिल्लीतून फोन आले. तिघांच्या राजीनाम्याची पत्रे सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पाठवण्यात आली होती. त्यानंतर ती स्वीकारण्यात आली आहेत.

माकन-गेहलोत यांच्यात चर्चा
मंत्रिमंडळ फेरबदलापूर्वी राज्याचे प्रभारी अजय माकन आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाली. शनिवारी सकाळपासून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेहलोत आणि माकन यांच्यात बऱ्याच वेळ चर्चा झाली. यामध्ये मंत्रिमंडळ फेरबदल आणि शपथविधीवर तसेच नवीन संसदीय सचिवांच्या नियुक्त्या आणि राजकीय नियुक्त्यांबाबतही चर्चा करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...