आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rajasthan Bjp Mla Meeting In Jaipur Vasundhara Raje, Satish Poonia Latest News Live Update; BJP To Bring No confidence Motion Against Ashok Gehlot Government

राजस्थान:अशोक गहलोत सरकारविरोधात भाजप आणणार अविश्वास ठराव; कॉंग्रेसने जनतेचे नव्हे, तर स्वतःचे हित सांभाळले- वसुंधरा राजे

जयपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजस्थान विधानसभेचे विधानसभा अधिवेशन 14 ऑगस्टपासून सुरू होत आहे

राजस्थानचे विधानसभेचे सत्र 14 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. राजस्थान विधानसभेत भाजपने अशोक गहलोत सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया म्हणाले की, उद्या मित्रपक्षांसह विधानसभेत अविश्वास ठराव आणत आहोत.

विधानसभेच्या अधिवेशनाच्या अगोदर सायंकाळी पाच वाजता कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक अशोक गेहलोत यांच्या शासकीय निवासस्थानी घेतली जाईल, ज्यात सचिन पायलट आणि त्यांच्या जवळच्या आमदारांनाही बोलावण्यात आले आहे. सचिन पायलट आणि अशोक गहलोत हे यावेळी समोरा-समोर येतील. काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत विधिमंडळ पक्षाची ही बैठक होईल.

दुसरीकडे माजी मुख्यमंत्री वसुंधरा यांनीही काँग्रेसवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, कॉंग्रेसने जनतेचे नव्हे, तर स्वतःचे हित सांभाळले. राजस्थानमध्ये आम्ही 10 वर्षे बरेच काम केले. कॉंग्रेसचे सरकार आल्यानंतर आमच्या योजनांची नावे बदलली किंवा बंद केली गेली. आता आम्हाला केंद्राचे काम लोकांपर्यंत न्यायचे आहे.

कॉंग्रेसच्या राजकीय संकटानंतर वसुंधरा राजे पहिल्यांदा जयपूरला पोहोचल्या. यापूर्वी 11 ऑगस्ट रोजी भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती, परंतु वसुंधरा हजर राहिल्या नव्हत्या. आजच्या बैठकीत 14 ऑगस्टपासून सुरू होणार्‍या विधानसभा अधिवेशनासाठी रणनीती आखली गेली.

बातम्या आणखी आहेत...