आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राजस्थान सत्तानाट्य:व्हिडिओत सभापती म्हणताहेत, ‘ते’ 30 निसटले असते तर सरकार पडले असते, राजस्थान हायकोर्टाने सभापतींना बजावली नोटीस

जयपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वादग्रस्त ऑडिओनंतर सभापती सी. पी. जोशींच्या व्हिडिओने खळबळ

राजस्थानात सुरू असलेल्या सत्तानाट्यात ऑडिआे प्रकरणानंतर आता एका व्हिडिओने खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ बुधवारचा असल्याचे सांगितले जाते. सूत्रांनुसार, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे पुत्र वैभव हे सभापती सी. पी. जोशींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. यादरम्यान दोघांत सरकारबाबत चर्चा झाली. त्यात जोशी यांनी अनेक गुपिते उघड केली. व्हिडिओत जोशी म्हणतात, “सरकारबद्दलचे हे प्रकरण खूपच टफ आहे.’ वैभव गहलोत उत्तरतात, “राज्यसभा निवडणुकीनंतर १० दिवस काढले, पुन्हा तसेच ठेवले.’ त्यावर जोशी म्हणतात, “३० जण (आमदार) निसटतात तेव्हा आपण काहीच करू शकत नाही. आपण कंठशोष करत बसलो असतो अन् त्यांनी सरकार पाडले असते. आपल्या हिशेबाने त्यांनी संपर्क साधला, यामुळे जमले. इतर कुणाला हे जमले नसते.’ जोशी हा सर्व संवाद अत्यंत बिनधास्तपणे कॅमेऱ्यापुढे बाेलत होते. त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या संवादानंतर चुकून हा व्हिडिओ माध्यमांना पाठवून दिल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, हा व्हिडिओ जाहीर होताच सभापती जोशी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे.

राजस्थान हायकोर्टाने सभापतींना बजावली नोटीस
राजस्थानातील ६ बसप आमदारांच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणावरून राजस्थान हायकोर्टाने विधानसभा सभापती आणि सचिवांना नोटीस जारी केली आहे. कोर्टाने त्यांना ११ ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ही नोटीस बसप आणि भाजप आमदार मदन दिलावर यांच्या या विलीनीकरणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरून बजावण्यात आली आहे.