आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी भाजपच्या काँग्रेसमुक्त भारताच्या नाऱ्याचा खरपूस समाचार घेतला आहे. दिल्लीच्या जंतरमंतरवर आयोजित काँग्रेसच्या सत्याग्रह आंदोलनात त्यांनी भाजप नेत्यांच्या बापजाद्यांनाही भारत काँग्रेसमुक्त करता येणार नसल्याचा दावा केला. ते म्हणाले -"पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपशी आमचे वैयक्तिक शत्रूत्व नाही. आमचा संघर्ष विचारधारेशी आहे."
गहलोत म्हणाले की, "भाजपचे नेते आम्हाला शत्रू मानतात. काँग्रेसमुक्त भारत करण्याची भाषा करतात. पण, त्यांच्या बापजाद्यांनाही असे करता येणार नाही. देशात प्रत्येक ठिकाणी काँग्रेस आहे. प्रत्येक गावात काँग्रेसची चौकी आहे. ही विचारधारा आहे. ती केव्हाच संपणार नाही. काँग्रेसची विचारधारा देशाच्या डीएनएत आहे."
भाजप-संघाची देशात दहशत
गहलोत म्हणाले -"त्यांची देश संविधानाने नाही तर आपल्या विचारधारेने चालवण्याची इच्छा आहे. त्यांचा विचार अत्यंत धोकादायक आहे. त्यांनी काय काय विचार केला आहे हे माहिती नाही. संघ व भाजपची भ्रष्टाचारातही बेबंदशाही माजली आहे. प्राप्तिकर विभाग, ईडीत कुणी ओळखीचे असतील तर त्यांना विचारा. देशात 10 पट जास्त भ्रष्टाचार वाढला आहे. हे लोक देशाची लूट करत आहेत. त्यामुळे लोकपाल वगैरेची गोष्ट सोडा."
राहुल गांधींच्या ईडी चौकशीविरोधात निदर्शने करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेणे व काँग्रेस मुख्यालयात पोलिस घुसल्याचाही गहलोत यांनी यावेळी समाचार घेतला.
गहलोत भाजपला इशारा देत म्हणाले -"राजस्थान भाजपच्या कार्यालयात पोलिस शिरले तर काय होईल? राजस्थानात आमचे सरकार आहे. तिथे भाजपने आंदोलन केले तर आम्हीही त्यांच्याशी असाच व्यवहार करावा काय?"
मोदींच्या भावावर छापा पडला तर कसे वाटेल?
गहलोत म्हणाले -"मी 13 तारखेला सीबीआय, ईडी, सीबीडीटी प्रमुखांना भेटण्याची वेळ मागितली. 15 तारखेला माझ्या भावावर खटला दाखल झाला. 17 ला छापा पडला. राजकीय संकटावेळीही माझ्या भावावर धाड पडली. 45 वर्षांपासून माझ्या भावाकडे एखादे लग्न असेल तर मी तिथे एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीसारखा जातो."
ते म्हणाले -"माझा भाऊ व माझ्यात 45 वर्षांपासून हेच संबंध आहेत. मतभेदही नाहीत. मी काँग्रेसला आपले सर्वस्व दिले आहे. माझ्यामुळे दुसऱ्यांना त्रास का? ज्या प्रकारे मोदींच्या भावाला कुणी ओळखत नाही. त्या प्रमाणे माझ्या भावालाही कुणी ओळखत नाही. भाजपची सत्ता गेल्यानंतर गुजरातमधील मोदींच्या भावावर धाडी टाकल्या तर त्यांना चांगले वाटेल काय?"
ईडीची नोटीस बजावताना लाज वाटली पाहिजे
गहलोत म्हणाले -"स्थिती गंभीर आहे. हे वेळही जाईल. हे तोंडावर पडतील. दुसरे काहीच होणार नाही. आता पीएम मोदी व अमित शाह यांचे विश्वासू मित्र व सल्लागार त्यांना योग्य सल्ले देत नाहीत. त्यांना मोदींची भीती वाटत असावी."
"सोनिया गांधींसारख्या पंतप्रधानपद नाकारणाऱ्या व्यक्तीला ईडीची नोटीस बजावण्यात आली. पंतप्रधान होण्यात व न होण्यात दिवस-रात्रीचे अंतर असते. पंतप्रधानपद नाकारणाऱ्या महान नेत्याला तुम्ही ईडीची नोटीस बजावली. तपास संस्थेला थोडीफार लाज वाटली पाहिजे. त्यांनी आपल्यावरील दबाव झुगारला पाहिजे."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.