आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राजस्थानच्या राजकीय वर्तुळात शनिवारपासूनच चर्चांना उधाण आले. राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट याचवेळी 10-12 आमदारांना घेऊन दिल्लीला रवाना झाले. अवघ्या काही तासांतच राजस्थानच्या राजकारणात बंडखोरीचे व्हायरस पसरले. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी 9 वाजल्यापासूनच सचिन पायलट आणि दिग्गज काँग्रेस नेत्यांमध्ये फोनवर चर्चा सुरू झाल्या. पायलट यांनी यावेळी बोलताना त्या नेत्यांना स्पष्ट केले की एसओजीने आमदारांच्या कथित घोडेबाजार प्रकरणात मला कलम 120 ब अंतर्गत नोटिस बजावली आहे. या कलमाने राजद्रोहाचा खटला होतो. प्रत्यक्षात मी या प्रकरणात आरोपी तर सोडाच संशयित सुद्धा नाही. केवळ दोन जणांशी माझी फोनवर बातचीत झाली. त्यावरूनच मला ही नोटिस पाठवण्यात आली आहे.
सचिन पायलट पुढे बोलताना म्हणाले, या प्रकरणात माझा जबाब घेणे हा निव्वळ एक बहाणा आहे. मला अटक करण्यासाठी कटकारस्थान केले जात आहेत. येथूनच पायलट यांनी बंडखोरीचे संकेत दिले. याच दरम्यान, सचिन पायलट यांना राजस्थानच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवणे आणि त्यांच्यासोबत आणखी एका नेत्याला उपमुख्यमंत्री पद देणे अशी चर्चा देखील सुरू होती.
घोडे विकल्यानंतरच जाग येईल का? सिब्बल
राजस्थानचे राजकारण तापलेले असताना दुपारी 12:27 वाजता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी एक ट्विट केले. "घोडे निसटून गेल्यानंतर जाग येणार का?" याचवेळी काँग्रेसचे संगठण सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांची प्रतिक्रिया आली. "प्रकरण खूप वाढले आहे. अशोक गहलोत यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना माहिती दिली की सचिन पायलट भाजपच्या संपर्कात असून सरकार पाडण्यासाठी कटकारस्थान करत आहेत." एकीकडे, या दोन्ही विधानांमुळे राजस्थानच्या राजकारणात अस्थिरता आणखी वाढली. तर दुसरीकडे, पायलट यांनी काँग्रेस नेत्यांचे फोन घेणे बंद केले.
वेगळा पक्ष काढण्यावर होत आहे विचार
याच दिवशी दुपारी 1:30 वाजता भाजपची एंट्री झाली. ज्योतिरादित्य शिंदे यांनी सर्वात आधी आपले जुने मित्र सचिन पायलट यांची भेट घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, यानंतर भाजप प्रवक्ते जफर इस्लाम यांनी पायलट यांच्याशी संवाद साधला आणि राजकीय समिकरणे जुळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. जफर इस्लाम यांच्याशी चर्चेनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना माहिती देण्यात आली. यानंतर जेपी नड्डांनी वेळोवेळी अमित शहांना अपडेट दिले. विशेष म्हणजे, जफर इस्लाम यांनी ज्योरिदित्य यांना भाजपमध्ये सामिल करून घेण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, सचिन पायलट नवीन राजकीय पक्ष स्थापित करण्याचा विचार करत आहेत.
या घडामोडी सुरू असताना संध्याकाळी 5:27 वाजता ज्योतिरादित्य शिंदेंनी ट्विट केले. की "माझा जुना मित्र सचिन पायलटची परिस्थिती पाहता मी दुखी आहे. मुख्यमंत्री गहलोत यांनी त्यांना बाजूला सारले. काँग्रेसमध्ये टॅलेंट आणि क्षमतेला वाव नाही असेच दिसून येते."
अनेक प्रश्न अजुनही अनुत्तरीत
संध्याकाळी 6:30 वाजता काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि राजस्थान काँग्रेसचे निवडणूक प्रभारी अविनाश पांडे यांनी पायलट यांच्याशी चर्चा केली. यावेळी एका फॉर्मुल्यावर चर्चा झाली. हाच फॉर्मुला घेऊन सुरजेवाला, अविनाश पांडे आणि अजय माकन जयपूरला रवाना झाले. रात्री 9 वाजेच्या सुमारास 72 शांत राहिलेले पायलट यांनी धक्कादायक विधान केले. आपल्याकडे 30 आमदारांचे समर्थन असून गहलोत सरकार अल्पमतात असल्याचा दावा त्यांनी केला. तरीही पायलट भाजपात जाणार का? मुख्यमंत्री पदाच्या अटीवर ते काँग्रेसमध्ये येतील का? की ते स्वतःचा राजकीय पक्ष काढणार आहेत? हे प्रश्न अनुत्तरीत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.