आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राजस्थान राजकीय नाट्य:मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाले- 'लोकशाही पद्धतीने सत्तेत आलेल्या सरकारला पाडण्याचा प्रयत्न होत आहे'

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो

राजस्थानत उद्भवलेल्या परिस्थितीबाबत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीले आहे. यात त्यांनी राजस्थानातील सरकार पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप लावला आहे. 

अशोक गेहलोत यांनी नरेंद्र मोदींना लिहीलेल्या पत्रात म्हटले की, 'राजस्थानात लोकशाही पद्धतीने सत्तेत आलेल्या सरकारला घोडेबाजाराच्या माध्यमातून पाडण्याचा प्रयत्न होत आहे. या मुद्याकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. आपल्याकडे बहुपक्षीय पद्धती असल्याने केंद्र आणि राज्यात वेगळ्या पक्षांची सरकारे निवडून येतात, हेच आपल्या लोकशाहीचे सौदर्यं आहे. करोना काळात लोकांचे जीव वाचवणे ही आमची प्राथमिकता आहे, पण अशा परिस्थितीत राजस्थानात निवडून आलेले सरकार पाडण्यात प्रयत्न होत आहे.'

'माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावेळेस 1985 मध्ये बनवलेल्या पक्ष बदल विरोधी कायदा आणि अटल बिहारी वाजपेयी सरकारकडून केलेल्या संशोधनाच्या भावनेला बाजूला सारुन काही काळापासून निवडूण आलेल्या सरकारांना पाडण्याचा प्रयत्न होत आहे. जनमताचा हा अपमान आहे. कर्नाटक आणि मध्यप्रदेशात असेच करण्यात आले आहे.'

'सरकार पाडण्याच्या या कृत्यात केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, भाजपचे इतर नेते आणि आमच्या पक्षातील काही अतिमहत्वकांक्षी नेत्यांचा सहभाग आहे. यातील भंवरलाल शर्मांसारख्या वरिष्ठ नेत्याने घोडेबाजार करून स्व. भैरोसिहं शेखावत यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. पैसेही अनेक आमदारांपर्यंत पोहोचले होते. पण, मी विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने तत्कालिन राज्यपाल बल्लिराम भगत आणि पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांना व्यक्तिशः भेटून याचा विरोध केला होता. अशाप्रकारे लोकशाही मार्गाने निवडणून आलेले सरकार पाडणे लोकशाहीच्या विरोधातील आहे. असे षडयंत्र सर्वसामान्य माणसांसोबत केलेला विश्वासघात आहे.'

'मला या गोष्टीचे नेहमी वाईट वाटेल की, जेव्हा सामान्य माणसांचा उदरनिर्वाह वाचवण्याची जबाबदारी केंद्र व राज्य सरकारची असताना केंद्रात सत्तेत असलेला पक्ष करोना नियंत्रणाची प्राथमिकता सोडून राज्यातील सरकार पाडण्यासाठी मुख्य भूमिका पार पाडत होता. असेच आरोप करोना काळात मध्य प्रदेशात सरकार पाडण्यावेळी झाले होते. त्याचबरोबर तुमच्या पक्षांची देशभर बदनामी झाली होती. मला माहिती नाही, याची किती माहिती आपल्याला आहे की दिशाभूल केली जात आहे. अशा कृत्यात सहभागी असलेल्या इतिहास कधीही माफ करणार नाही. मला पूर्ण विश्वास आहे की सत्याबरोबर लोकशाही परंपरा व संविधानीक मूल्यांचा विजय होईल आणि आमचे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल,' असे गेहलोत यांनी आपल्या पत्राद्वारे म्हटले आहे.