आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस नेत्याच्या मुलीचे अपहरण:फोनवर म्हणाली - पप्पा, मुले पाठलाग करत आहेत, लवकर या; एअरपोर्ट रोडवर आढळली स्कूटी

जयपूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूरमध्ये काँग्रेस नेते गोपाळ केसावत यांच्या मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. अपहृत मुलीने केसावत यांना फोन या घटनेची कल्पना दिली होती. काही मुले माझा पाठलाग करत आहेत. पप्पा, लवकर या, असे ती आपल्या वडिलांना म्हणाली होती.

केसावत यांनी सोमवारी रात्री उशिरा प्रताप नगर पोलिस ठाण्यात अज्ञात गुन्हेगारांविरोधात मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला. दुसरीकडे, सीएसटी व पोलिस पथक अभिलाषा केसावतचा (21) शोध घेण्यात गुंतले आहेत.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, अभिलाषा स्कूटीने पालेभाज्या घेण्यासाठी एनआरआय सर्कल भागात गेली होती. ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबाने तिचा शोध सुरू केला. त्यानंतरही ती सापडली नसल्यामुळे त्यांनी सोमवारी रात्री उशिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दुसरीकडे, मंगळवारी सकाळी अभिलाषाची स्कूटी विमानतळ रोडवर बेवारस स्थितीत आढळली.

प्रतापनगर सीआय भजन लाल यांनी सांगितले की, प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. या प्रकरणी घटनास्थळालगतच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजची पडताळणी केली जात आहे.

केसावत म्हणाले - मुलीने काहीजण पाठलाग करत असल्याचे सांगितले होते

गोपाळ केसावत यांनी पोलिसांना सांगितले की, 'अभिलाषा सोमवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास घराबाहेर पडली होती. त्यानंतर 6.05 वा. तिने मला फोन करून पप्पा, लवकर या, काही मुले माझा पाठलाग करत असल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांसह मी स्वतः गाडी घेऊन एनआरआय सर्कलजवळ पोहोचलो.

पण तिथे मुलगीच नाही तर तिची स्कूटीही आढळली नाही. मुलीचा फोन लावला तर तो स्विच ऑफ आला. त्यानंतर मी माझ्या नातलगांसह आसपासच्या परिसरात तिचा शोध घेतला. पण ती कुठेच आढळली नाही. त्यानंतर रात्री उशिरा प्रतापनगर पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला.

गोपाळ केसावत काँग्रेसच्या मागील सरकारमध्ये घुमंतू बोर्डाचे अध्यक्ष होते.
गोपाळ केसावत काँग्रेसच्या मागील सरकारमध्ये घुमंतू बोर्डाचे अध्यक्ष होते.

वडिलांनीच शोधली स्कूटी

अभिलाषा ज्या स्कूटीवर पालेभाज्या घेण्यासाठी गेली होती. ती स्कूटी केसावत यांना मंगळवारी सकाळी एअरपोर्ट रोडवर बेवारस स्थितीत आढळली. त्यामुळे पोलिस एनआरआय सर्कलसह ज्या ठिकाणी स्कूटी आढळली, तेथील सर्वच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पडताळणी करत आहे.

केसावत घुमंतू बोर्डाचे माजी अध्यक्ष

अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वातील मागील सरकारमध्ये केसावत राजस्थान घुमंतू बोर्डाचे अध्यक्ष होते. तसेच घुमंतू विभागाचे नेतृत्वही त्यांनी केले. ते प्रदिर्घ काळापासून काँग्रेसमध्ये सक्रीय आहेत.

पोलिसांकडून सीसीटीव्हीची पडताळणी

प्रतापनगर सीआय भजन लाल यांनी सांगितले की, आतापर्यंतच्या तपासणीत सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये काहीच संशयास्पद आढळले नाही. प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...