आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बुधवारी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिवस होता. या निमित्त एसीबी कार्यालय स. माधोपूरमध्ये कार्यक्रम ठेवण्यात आला. यात डीएसपी भैरूलाल मीणा मुख्य वक्ते होते. त्यांनी भाषण दिले, आपल्याला पूर्ण प्रामाणिकपणे काम करून देशाला भ्रष्टाचार मुक्त करायचे आहे. केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने लाच मागितली तर टोल फ्री नंबर १०६४ किंवा हेल्पलाइन नंबर ९४१३५०२८३४ वर काेणत्याही क्षण कॉल किंवा व्हॉट्सअॅप करू शकता. विशेष म्हणजे या भाषणाच्या एका तासानंतर एसीबीने डीएसपी मीणाला ८० हजारांची लाच घेताना अटक केली. सोबतच त्यांना लाच देणाऱ्या जिल्हा परिवहन अधिकारी (डीटीओ)लाही अटक केली गेली. पहिल्यांदाच एसीबीमधील आरपीएस पातळीच्या अधिकाऱ्याला स्वत: एसीबीने ट्रॅप केले. आता दोघांची चौकशी होईल. तपासणीत मिळालेल्या पुराव्यानंतर एसीबी इतर अधिकाऱ्यांविरुद्ध खटला दाखल करू शकते.
एसीबी डीजी म्हणाले- २ महिन्यांपासून हप्ता घेण्याच्या तक्रारी आल्या
कोटाच्या आकाशवाणी कॉलनीतील निवासी डीएसपी भैरूलाल मीणा सध्या सवाई माधाेपूरमध्ये एसीबी चौकी प्रभारी आहेत. त्यांच्याविरोधात दोन-तीन महिन्यांपासून सतत मासिक बंदी घेण्याच्या तक्रारी येत होत्या. हप्तादेखील ते ठाण्यात अधिकाऱ्यांना बोलावून घेत होते. त्यामुळे टीमने नजर ठेवली. बुधवारी जयपूरवरून एसीबीची टीम पोहोचली तेव्हा करौलीचे दलपुरा निवासी डीटीओ महेश चंद मीणा यांना मासिक बंदीचे ८० हजार रुपये देत होते. तेव्हाच एसीबीने दोघांना अटक केली. डीटीओ सवाई माधोपूरमध्ये भाड्याने राहतो. त्याची खोली सील करण्यात आली आहे. दुसरीकडे डीएसपी मीणा यांच्या घराच्या तपासणीत जमिनीचे कागद आणि १.६१ लाख रुपये राेख िमळाले आहेत. दोघांच्या इतर ठिकाणाची चौकशी केली जात आहे. - बीएल सोनी, डीजी, एसीबी
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.