आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापती-पत्नीने आपल्या 5 मुलांसह नर्मदा कालव्यात उडी घेतल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील सांचोरमध्ये घडली. 9 वर्षीय प्रकाशचा मृतदेह दुपारी चारच्या सुमारास बाहेर काढण्यात आला असून उर्वरितांचा शोध सुरू आहे. ही घटना दुपारी अडीचच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. गोताखोरांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. तर जोधपूरमधून एसडीआरएफच्या 2 पथकांनाही पाचारण करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटनेची माहिती हेल्पलाइन 101 अभय आदेश जालोरे यांना भंवर सिंग राजपूतने दिली होती. शंकर आणि त्यांच्या पत्नीसोबत भांडण झाले असून शंकरने रागात पत्नी व मुलांसह घर सोडले आणि सिद्धेश्वर गाठले. मुलांमध्ये 3 मुली आणि 2 मुले होती. या सर्वांचे कपडे नर्मदा कालव्याच्या मुख्य कालव्याजवळ आढळून आले.
सांचोरचे सीओ रुप सिंह इंदा यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार पती-पत्नीमध्ये भांडण झाल्याचे समोर आले आहे. यानंतर दोघांनी मंगळवारीच पाच मुलांसह घर सोडले होते. याची माहिती बुधवारी पोलिसांना मिळाली. एका मुलाचा मृतदेह सापडला आहे. तर उर्वरितांचा शोध सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी निशांत जैन आणि एसपी किरण कांग सिद्धू हे जालोर जिल्हा मुख्यालयातून घटनास्थळी रवाना झाले आहेत.
कुटुंबातील चौघांची आत्महत्या, पुण्यातील घटना
शेअर बाजारात पैसे गमावल्याने आलेल्या आर्थिक नैराश्यातून पुण्यातील केशवनगर परिसरात एकाच कुटुंबातील चौघांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. येथे वाचा संपुर्ण बातमी.
पुण्यात 7 मृतदेह सापडल्याने खळबळ
पुणे जिल्ह्यातल्या पारगाव (ता. दौंड) येथे एकाच कुटुंबातील 7 मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. बदलत्या काळात आतंरधर्मीय, आंतरजातीय लग्न मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहेत. मात्र, अद्याप जुन्या रितीरिवाजांना पाळून असलेल्या एका कुटंबातील मुलाने लग्नाकरिता एका महिलेस पळवून नेल्याच्या रागातून मुलाच्या पित्यासह कुटुंबाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.