आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजस्थानातील कुख्यात गँगस्टर राजू ठेहटच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी रविवारी सकाळी 4 शूटर्ससह 5 जणांना अटक केली आहे. राजस्थानचे पोलिस महासंचलाक (डीजीपी) उमेश मिश्रा यांनी सांगितले की, 2 गुन्हेगारांना हरियाणा बॉर्डरलगतच्या डाबला येथून अटक करण्यात आली, इतर तिघांच्या झुंझुनूंच्या पौंख गावातून मुसक्या आवळण्यात आल्या.
मिश्रा म्हणाले - अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी मनीष जाट व विक्रम गुर्जर हे दोघे सिकरचे रहिवासी आहेत. तर सतीश कुम्हार, जतिन मेघवालस व नवीन मेघवाल हे हरियाणाच्या भीवाणीचे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र व चोरीची क्रेटा कार जप्त केली आहे.
3 शूटर्स एका मंत्र्याच्या गोदामात लपले होते
सूत्रांच्या माहितीनुसार, राजू ठेहटची हत्या करणारे 3 शूटर झुंझुनूंच्या पौंख गावातील एका मायनिंग गोदामात लपले होते. हे गोदाम राज्यातील एका मंत्र्याच्या मालकीचे आहे. पण पोलिसांनी अद्याप त्याची पुष्टी केली नाही.
गावकऱ्यांनी केली पोलिसांची मदत
सूत्रांच्या माहितीनुसार, पौंख गावातील 3 गुंड पकडण्यासाठी पोलिसांनी रात्रभर मोहिम राबवली. त्यात गावकऱ्यांनी पोलिसांची खूप मदत केली. या ऑपरेशनमध्ये 200 हून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांच्या 15 पथकांचा समावेश होता. त्याचे नेतृत्व झुंझुनू व सिकरचे एसपी करत होते.
2 उच्चपदस्थ पोलिस अधिकारी सिकरला रवाना
या आरोपींच्या मुसक्या आळण्यासाठी व संपूर्ण मोहिमेची माहिती देण्यासाठी एडीजी क्राइम रवी प्रकाश मेहरा व डीआयजी अजयपाल लाम्बा यांना सिकरला पाठवण्यात आले आहे. जवळपास 24 तासांच्या आत सर्वच आरोपींच्या अटकेसाठी डीजीपींनी सिकर पोलिस अधीक्षकांसह संपूर्ण टीमचे कौतुक केले.
या प्रकरणी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एका ट्विटद्वारे, आरोपींवर लवकरात लवकर खटला चालवून कठोर शासन करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.
दुसरीकडे, शनिवारी रात्रभर सिकरच्या एस के रुग्णालयाबाहेर राजू ठेहटच्या समर्थकांनी निदर्शने केली. त्यांनी ठेहट व शेतकरी ताराचंदचे पार्थिव आरोपींना अटक होईपर्यंत ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यानुसार पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्यामुळे हे निदर्शन रद्द केले जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची मागणीही निदर्शकांनी केली आहे.
गँगस्टर राजू ठेहटची शनिवारी सकाळी त्याच्या घराबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाची जबाबदारी कॅनडातील गँगस्टर रोहित गोदाराने घेतली आहे. त्याने ही हत्या अत्यंत सूनियोजितपणे केल्याचा संशय आहे.
4 छायाचित्रांत पाहा, कशी झाली राजूची हत्या?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.