आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rajasthan Government Crisis Latest News And Updates ; Ashok Gehlot, Deputy Chief Minister Sachin Pilot Camp MLA

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकार हाॅटेलमध्ये, भवितव्य अधांतरी:पायलट गटाकडून आव्हान : बहुमत चाचणी घेऊन दाखवा; सरकारकडे 106 आमदार, मुख्यमंत्री गहलाेत यांचा दावा

जयपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर येथे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निवासस्थानी आमदारांची बैठक झाली. यावेळी उपस्थित आमदार - Divya Marathi
जयपूर येथे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निवासस्थानी आमदारांची बैठक झाली. यावेळी उपस्थित आमदार
  • राजस्थानात महिनाभरात दुसऱ्यांदा आमदार पॉलिटिकल क्वाॅरंटाइन
  • राहुल-प्रियंकांनी पायलट यांच्याशी संपर्क केला, मात्र पायलट यांचा समेटास नकार

राजस्थानातील काँग्रेस सरकारबाबत साेमवारीही सस्पेन्स कायम राहिला. मुख्यमंत्री अशाेक गहलाेत यांनी आपल्या घरी आमदारांची बैठक बोलावून १०६ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. विजयी मुद्रा दाखवून त्यांनी सर्व आमदारांना ४ बसद्वारे फेअर माउंट हाॅटेलमध्ये नेले. असे महिनाभरात दुसऱ्यांदा घडले आहे.

सूत्रांनुसार, बैठकीत ८८ काँग्रेस आमदार हजर होते. उपमुख्यमंत्री सचिन पायलटसह १९ काँग्रेस आमदार गैरहजर राहिले. ३० आमदारांच्या पाठिंब्याचा दावा करणारे पायलट आपल्या समर्थकांसह मानेसरच्या हाॅटेलमध्ये आहेत. साेमवारच्या घटनाक्रमानंतर अवघे सरकार हॉटेलमध्ये कैद झाले आहे. भाजप आणि पायलट गटाने बहुमत चाचणीची मागणी केली आहे. दुसरीकडे, पायलट यांच्या निकटवर्तीयाने सांगितले की, ‘गहलोत यांच्याकडे बहुमत असेल तर त्यांनी ते आपल्या बागेऐवजी विधानसभेत सिद्ध करून दाखवावे.’ पायलट हे भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असेही त्यांच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट केले.

राहुल-प्रियंकांनी पायलट यांच्याशी संपर्क केला, मात्र पायलट यांचा समेटास नकार

काँग्रेसचे पायलट यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू होते. राहुल गांधी, प्रियंका गांधींसह पी. चिदंबरम व के.सी. वेणुगाेपाल यांनी पायलट यांच्याशी संपर्क साधला. काँग्रेस सूत्रांनुसार पायलट समेटास राजी नाहीत. त्यांनी राहुल गांधींसोबत भेटीसही नकार दिला आहे. तथापि, सूत्रांनी दावा केला की, पायलट यांनी सर्वाेच्च नेतृत्वापुढे चार अटी ठेवल्या आहेत. यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षापद कायम ठेवणे, गृह आणि वित्त मंत्रालय देण्याच्या मागणीचाही समावेश आहे.

विधिमंडळ दलाच्या बैठकीत काँग्रेसच्या १०७ आमदारांपैकी १९ आलेच नाही, म्हणून आज पुन्हा बोलावली बैठक

काँग्रेसच्या विधिमंडळ दलाच्या बैठकीत साेमवारी काँग्रेसचे ८८ आमदारच आले. तथापि, बहुमतासाठी किमान १०१ आमदांची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत किंवा उपमुख्यमंत्री सचिव पायलट यांनी समर्थक आमदारांची कोणतीही यादी जारी केलेली नाही. यामुळे राजस्थानात सरकारबाबत सस्पेन्स कायम आहे. मुख्यमंत्री गहलोत यांनी मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा विधिमंडळ दलाची बैठक बोलावली आहे.

भाजपने सचिन पायलट गटापासून राखले अंतर 

पायलट यांच्याशी संपर्काबाबत भाजप नेतृत्व खूप सावधगिरी बाळगत आहे. ३० आमदारांच्या पाठिंब्याच्या दाव्यावर भाजपला पूर्ण विश्वास नाही. यामुळे भूपेंद्र यादव, ज्याेतिरादित्य सिंधिया आणि भाजप खासदार आेम माथूर या तीन मध्यस्थांमार्फतच सर्व संवाद साधला जात आहे.

कारवाई टाळण्यासाठी सचिन पायलट यांचे ‘मौन’

पायलट थेट सरकारविरुद्ध काहीच बोलत नाही आहेत. त्यांनी ट्विट केले नाही, ना अधिकृत वक्तव्य दिले. त्यांच्या बाजूने सर्व वक्तव्ये त्यांच्या निकटवर्तीयांकडून येत आहेत. पक्षविराेधी कारवायांचा ठपका आपल्यावर येऊ नये म्हणून त्यांनी हे धोरण अवलंबले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser