आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकीय घडामोडी:राजस्थानात सत्तेचा ‘खेळ’ सुरू! पायलट 15 आमदारांसह दिल्लीत, गहलोत यांनी बोलावली तातडीची बैठक

जयपूर10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्याच्या सीमा सील, पास अनिवार्य

राजस्थानात सरकार पाडण्यासाठी आखण्यात आलेला कट आणि कथित आमदार खरेदीप्रकरणी एसओजीच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी राज्यात राजकीय घडामोडींना अधिकच वेग आला. सकाळी काँग्रेस आणि भाजपने परस्परांवर आरोप-प्रत्यारोप केले. सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना आपल्या निवासस्थानी बोलावून तातडीची बैठक घेतली.

दरम्यान, उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह काँग्रेसचे १०-१२ आणि २-३ अपक्ष आमदार दिल्लीत दाखल झाल्याची बातमी आली. यातील काही आमदार दिल्लीत, तर काही हरियाणातील हॉटेलमध्ये असल्याचीही माहिती आहे. गहलोत सरकारवर नाराज हे आमदार सोनिया गांधी यांची भेट घेऊन आपली नाराजी मांडतील, असे मानले जाते. दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी रात्री साडेआठ वाजता कॅबिनेट मंत्र्यांची बैठक घेतली. यात सुमारे १२ मंत्री आणि तेवढेच आमदार उपस्थित होते. सुमारे २ तास चाललेल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांच्या सातत्याने संपर्कात राहावे, अशी सूचना देण्यात आली.

तीन अपक्ष आमदारांवर एसीबीने दाखल केला गुन्हा : डुंगरपूर व बांसवाडाच्या आमदारांना आमिषे दाखवून आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल एसीबीने शनिवारी तीन अपक्ष आमदारांविरुद्ध एफआयआर दाखल केला. अशा प्रकरणात प्रथमच आमदारांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या अपक्ष आमदारांकडे मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याचेही एसीबीचे म्हणणे आहे.

राज्याच्या सीमा सील, पास अनिवार्य

राज्याच्या सीमा पुन्हा सील करण्यात आल्या असून गृह विभागाने शनिवारी रात्री उशिरा हे आदेश काढले. राज्याबाहेर जाण्यासाठी पास अनिवार्य आहे. कोरोना संसर्गाचे कारण देऊन हा आदेश काढण्यात आला असला तरी गेल्या महिन्यात राज्यसभा निवडणुकीवेळी झालेल्या घोडेबाजाराच्या वेळी असाच आदेश काढण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...