आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rajasthan Health Workers Wearing Personal Protective Equipment (PPE) Kit 50 Degrees Celsius

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगातील सर्वात उष्ण चुरूतून रिपोर्ट:50 डिग्री तापमानात पीपीई किट घालून घाम आणि भीतीच्या सावटात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची कहाणी

चूरू (अक्षय बाजपेयी)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पीपीई किट घालून काम करणे आगीच्या भट्टीत तपण्यासारखे, एक तासापेक्षा अधिक वेळ किट घालू शकत नाहीत

राजस्थानातील चुरू येथे पारा 50 डिग्रीवर पोहोचला आहे. जगातील सर्वात उष्ण चुरुत घरातील कुलर-पंखे आग ओकत आहे. अशा परिस्थितीत पीपीई किट परिधान करून कोरोना वॉर्डमध्ये काम करणे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही. रुग्णालयातील बहुतांश वार्डात कुलर-एसी नाहीत, अशावेळी हे आव्हान अधिक वाढते. 

एकीकडे चुरूतील लोक गरमीमुळे दिवसात एकदाही दरवाजा-खिडकी उघडत नाहीत, अशावेळी आरोग्य कर्मचारी केवळ ड्युटीसाठी रुग्णालयात जात नाही तर पीपीई किट परिधान करत कोरोना रुग्णांचा उपचार करत आहेत. 

कुलर-एसी नसलेल्या वार्डात पीपीई किट घालून 1 तास ड्यूटी

उज्जन्शीला नर्स असून चूरूच्या एनएनएम वसतिगृहातील कोरोना वॉर्डमध्ये ड्यूटी करत आहेत. त्या सांगतात की, चुरू येथे पीपीई किट घालून काम करणे हे आगीच्या भट्टीत तपण्यासारखे आहे. 

शहराबाहेरील एनएनएम हॉस्टलमध्ये कोरोना वार्ड तयार करण्यात आला आहे. नवीन इमारत असल्यामुळे येथे कुलर किंवा एसी नाहीये. केवळ पंखे बसवण्यात आले आहेत. स्टाफ रुममध्ये देखील कूलर नाहीत. 

उज्जन्शीला सांगते की, वॉर्डात फक्त एक तास किट घालून थांबू शकतो. किट घातल्यानंतर 10 मिनिटांतच घामाने कपडे ओले होतात. 

कोरोना रूग्णांना औषध, चहा, काढा देणे, रुग्णांचे तापमान घेणे इत्यादी त्यांची कामे आहेत. या सगळ्या कामासाठी वेळ लागतो आणि किट न घालता वॉर्डात जाता येत नाही.

उजनीशीला पीपीई किट घालून रूग्णांना चहापासून काढा देण्याचे काम करते.
उजनीशीला पीपीई किट घालून रूग्णांना चहापासून काढा देण्याचे काम करते.

उज्जन्शीला सांगते की, उष्णतेपासून वाचण्यासाठी मी जवळ कांदा ठेवते. 

15 मिनिटे पीपीई किट घातल्यानंतर वाटते की, किट काढली नाही तर बेशुद्ध होऊ

कोरोनारुग्णांच्या सॅम्पलिंगचे काम करणारा मुकेश सांगतो की, "माझे काम फील्ड आणि हॉस्टलमध्ये दोन्ही ठिकाणी आहे. सॅम्पल घेण्यापूर्वी पीपीई किट परिधान करावीच लागते." फील्डवर आम्ही 15 मिनिटांपेक्षा अधिक काळ किट घालू शकत नाही. थोडा जरी उशीर झाला तर वाटते की, किट नाही काढली तर बेशुद्ध होऊ. 

मुकेश सांगतो की, काही दिवसांपूर्वी किट परिधान करून 30 रुग्णांचे सॅम्पल घेत होतो. परंतु आता एकावेळी 15 सॅम्पल घेऊ शकतो. 15 मिनिटांनंतर किट काढून एक तास आराम करतो. पोटभर पाणी पितो. पुन्हा नवीन किट घालून सॅम्पलिंग करत आहोत. 

डॉक्टर जेवणात फक्त लिक्विड पदार्थ घेतात, कारण भीती वाटते

चूरूच्या मेडिकल कॉलेजमधील मेडिसिनचे प्रोफेसर डॉक्टर एफएच गौरी सांगतात की, येथील लोकसंख्येपैकी 40 ते 45 टक्के लोक मुस्लिम आहेत. मी 30 वर्षांपासून काम करतो. मला येथे सर्वजण ओळखतात. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी फील्डवर लोकांना समजवण्याची जबाबदारी मला दिली आहे. जेणेकरून समुदायातील लोक उपचारात मदत करतील. 

उन्हामुळे सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत फील्डवर काम करतो. त्यानंतर वॉर्डात पेशेंट पाहतो. ते काम देखील दुपारी 2 आधी पूर्ण करतो. यानंतर इमरजन्सी केस पाहतो, नाहीतर संध्याकाळच्या राउंडमध्ये सर्वांची तपासणी करतो. 

डॉ गौरी सांगतात की, रोझापासूनच मी खीर, शिकंजी यांसारखे लिक्विडवर ड्यूटी करत आहे. जेवणात लिक्विड पदार्थाशिवाय काहीच खात नाही. कारण इतक्या गरमीत पीपीई कीट घातल्यानंतर जीवाची घालमेल सुरू होती. एका तासापेक्षा अधिक वेळ किट देखील घालू शकत नाहीत. 

बातम्या आणखी आहेत...