आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rajasthan Jaipur Audi Car Road Accident News; Speeding Audi Hits Man In Jaipur Sodala Area, Victim Died On Spot

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हा अपघात नसून हत्या आहे:100 किलोमीटरच्या स्पीडने ऑडी पळवणाऱ्या तरुणींने मारली जोरदार टक्कर, 30 फूट दूर घराच्या छतावर उडून पडल्याने तरुणाचा मृत्यू

जयपूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूरच्या अजमेर एलिवेटेड रोडवर शुक्रवारी सकाळी 8 वाजता 2 तरुणी 100 किलोमीटरच्या स्पीडने ऑडी कार पळवत होत्या. यादरम्यान कारवर नियंत्रण न झाल्यामुळे एका तरुणाला जोरदार टक्कर मारली. ही टक्कर इतकी भीषण होती की, तरुण 30 फूट हवेत उडून एका घराच्या छतावर पडला. यात त्याचा एक हात आणि एक पाय शरीरापासून वेगळा झाला. या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.

कांस्टेबल भर्ती परीक्षा देण्यासाठी पालीवरुन आला होता

अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव मादाराम होते. तो कांस्टेबल भर्ती परीक्षा देण्यासाठी पालीवरुन जयपूरला आला होता. परीक्षा शुक्रवार सकाळी 9 वाजता होती. मादाराम मिशन कम्पाउंडकडून अजमेर रोडकडे एलिवेटेड रोडवरुन चालत होता. यादरम्यान सुसाट कार चालवत येणाऱ्या तरुणींनी त्याला जोरदार टक्कर मारली. यात अपघातात तरुण 30 फूट दूर असलेल्या घराच्या छतावर पडून मृत्यू झाला.

सोनी हॉस्पिटलच्या मालकाच्या नावावर रजिस्टर आहे कार

एअर बॅग उघडल्याने कारमधील तरुणीचा जीव वाचला. अपघात झाल्यानंतर तरुणी कारबाहेर आल्या आणि आपल्या घरच्यांना फोन लावला. कार चालवणाऱ्या तरुणीचे नाव नेहा सोनी(35) आहे, तर तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणीचे नाव प्रज्ञा आहे. कार शहरातील सोनी हॉस्पिटलच्या मालकाच्या नावावर रजिस्टर आहे.