आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्वेलरला स्कॉर्पिओने चिरडण्याचा प्रयत्न VIDEO:धडक लागताच दूर उडाला, जीव वाचला...

जोधपूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील भीकमकोर गावात एका दागिने व्यावसायिकावर त्याच्या घराबाहेरच जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. भर दिवसा त्याला स्कॉर्पिओने चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्कॉर्पिओच्या जोरदार धडकेने तो गाडीखाली येण्याऐवजी वेगाने दूर फेकल्या गेला.

धडकेनंतर लगेच तो स्वतःला सावरत पुन्हा उभा राहिला. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यात स्पष्टपणे दिसते की, दागिने व्यावसायिक दुचाकीच्या डिक्कीतून काहीतरी काढत आहे. याचवेळी एक स्कॉर्पिओ त्याला वेगाने धडक देते. यावेळी व्यावसायिक दूर हवेत उडतो आणि भिंतीला धडकून 7 फूट अंतरावर जाऊन पडतो. सुदैवाने या घटनेत तो जिवंत बचावला आहे. ओसिया पोलिसांनी या प्रकरणी दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

ही घटना बुधवारी दुपारी 3 वाजता जोधपूरच्या भीकमकोर गावात घडली. भीकमकोरमध्ये राहणारे दागिने व्यावसायिक कुंदनमल सोनी यांनी ओसिया पोलिस ठाण्यात जीवघेणा हल्ला झाल्याची तक्रार दाखल केली आहे. कुंदन यांनी तक्रारीत म्हटले आहे की, बुधवारी दुपारी 3 वाजता ते भीकमकोरमधील घराबाहेर गाडीच्या डिक्कीतून सामान काढत होते. यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओने त्यांना जोरदार धडक देत चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पवन आणि इतर दोघांविरोधात हल्ल्याची तक्रार दिली आहे.

घटनेत कुंदनमल यांची दुचाकी पूर्णपणे तुटली. सुदैवाने कुंदनमल यात वाचले.
घटनेत कुंदनमल यांची दुचाकी पूर्णपणे तुटली. सुदैवाने कुंदनमल यात वाचले.

स्वत:वर झालेल्या हल्ल्याबाबत ज्वेलर्स कुंदनमल यांनी सांगितले की, पवन नावाच्या आरोपीशी आपला थेट वाद नाही, तो ठेकेदार आहे. कुंदनमलने सांगितले- माझा खास मित्र दिलीप राठी याच्या प्लॉटवर पवनने कब्जा केला आहे. यावरून पवन आणि दिलीप यांच्यात वाद सुरु आहे. बुधवारी सरपंचांसह गावातील काही लोक जमले आणि पवनची समजूत घालण्यासाठी त्याच्या घरी गेले होते.

त्यांनी बराच वेळ पवनला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की हा भूखंड दिलीपने खरेदी केला आहे. त्याच्याकडे सर्व कागदपत्रे आहेत. पण पवनला समजावूनही काही फायदा झाला नाही. चर्चा निष्फळ ठरली. कुंदनमल म्हणाले- पवनला वाटले असेल की या संपूर्ण घटनेमागे माझे डोके आहे. असा विचार करून त्याने मला रस्त्यातून दूर करण्यासाठी त्याच्या स्कॉर्पिओने मला चिरडण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी मी नुकताच माझ्या घरी पोहोचलो होतो. पवन त्याच्या साथीदारांसह माझ्यावर आधीच लक्ष ठेवून होता. मी तिथे पोहोचताच त्याने स्कॉर्पिओचा वेग वाढवून मला चिरडण्याचा प्रयत्न केला. आज पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आहे. पवनचा लहान भाऊ जितेंद्र शर्मा याला अटक करण्यात आली आहे.

घटनेत कार दुचाकीला चिरडून निघून गेली.
घटनेत कार दुचाकीला चिरडून निघून गेली.

स्कॉर्पिओच्या धडकेमुळे कुंदनमल उडून एका बाजूला पडले. यात ते जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जोधपूर ग्रामीणचे एसपी अनिल कायल यांनी सांगितले की, ज्वेलर कुंदनमल आणि आरोपी पक्ष यांच्यात काही कारणावरून जुने वैर आहे. यादरम्यान बुधवारी कुंदन दुचाकीजवळ असताना आरोपीने त्याला स्कॉर्पिओने चिरडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...