आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rajasthan Jhalawar Gangrape Case Update | Kota 15 Year Old Girl Raped By 18 People, Rajasthan Crime News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजस्थानमधील घटना:15 वर्षांच्या मुलीवर 18 पेक्षा जास्त नराधमांनी 9 दिवस केला बलात्कार; आतापर्यंत 4 अल्पवयिनसह 20 जण ताब्यात

कोटाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • घरी सोडा असे म्हटल्यावर तिला चाकूचा धाक दाखवला जात होता.

कोटा येथील एका 15 वर्षांच्या मुलीवर झालावाड येथे नेऊन 18 पेक्षा जास्त नराधमांनी तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला आहे. तिला वेदना होऊन ती ओरडायची तेव्हा तिला नशा दिला जात होता. नशा घेण्यास नकार दिल्यावर तिला वाईट पध्दतीने मारहाण करण्यात येत होती. घरी सोडा असे म्हटल्यावर तिला चाकूचा धाक दाखवला जात होता.

पीडित मुलीचे म्हणणे आहे की, 25 फेब्रुवारी रोजी तिची ओळखीची मुलगी आणि तिचा साथीदार तिला बॅग घेण्याच्या बहाण्याने कोटा येथील सुकेत येथून झालावार घेऊन गेले होते. तेथे तिला नराधमांच्या ताब्यात देण्यात आले, ज्यांनी तिच्यावर 9 दिवस घर, हॉटेल, बांधकाम घर आणि शेतात अनेकदा बलात्कार केला. 5 मार्च रोजी पुन्हा सुकेत येथे सोडले.

पोलिसांवर रिपोर्ट न घेण्याचा आरोप
6 मार्चला पीडितेने विधवा आईसोबत जाऊन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली. पीडितेच्या भावाचा आरोप आहे की, तो बहिण बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी अनेक वेळा पोलिस स्टेशनमध्ये गेला. मात्र पोलिसांनी त्याला पळवून लावले. पीडितेच्या आईने म्हटले की, नराधमांना फाशी द्यायला हवी. आतापर्यंत 4 अल्पवयीन आणि 20 आरोपींना ताब्यात घेतले आहे. रामगंजमंडीचे डीएसपी मंजीत सिंह यांनी म्हटले की, 1-2 दिवसांमध्ये इतर आरोपींनाही अटक करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...