आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rajasthan, Jodhpur, JhalawarBird Flu Virus; Terror Rises In Rajasthan Jodhpur Kota Jhalawar After Death Of Crows

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जोधपूरनंतर झालावाडमध्ये कावळ्यांचा मृत्यू:बर्ड फ्लूची खात्री पटल्यानंतर राजस्थानमध्ये खळबळ, माणसांनाही धोका

झालावाड/जोधपूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डिसेंबरपासून रोज कावळ्यांचा मृत्यू होत आहे, परीक्षणासाठी भोपाळला पाठवले कावळ्यांचे सँपल

राजस्थानमध्ये जोधपूरनंतर झालावाडमध्येही मोठ्या प्रमाणात कावळ्यांच्या मृत्यूची घटना समोर आली आहे. झालावाडमध्ये एवियन इन्फ्लूएंजा (एक प्रकारचा बर्ड फ्लू) मुळे कावळ्यांचा मृत्यू होत असल्याची खात्री पटल्यानंतर राज्यात पोल्ट्रीचा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खलबळ माजली आहे. झालावाड जिल्हा प्रशासनाने राडीच्या बालाजी परिसरातील एक किलोमीटर परिसरात बुधवारी कर्फ्यू लावण्यात आला.

बालाजी परिसरात 25 डिसेंबरपासून दररोज कावळ्यांचा मृत्यू होत आहे. येथे आतापर्यंत 100 पेक्षा जास्त कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक कावळे आजारी पडले आहेत. दरम्यान, कावळ्यांचे सँपल परीक्षणासाठी भोपाळला पाठवण्यात आले आहेत.

एक्सपर्ट व्ह्यू: एवियन इन्फ्लूएंजा पक्षांसह माणसांमध्ये पसरू शकतो

पशू चिकित्सक डॉ. टीए बंसोड यांनी सांगितले की, एवियन इन्फ्लूएंजा एक प्रकारचा बर्ड फ्लू आहे. हा व्हायरस संसर्गजन्य आहे, जो एका पक्षातून दुसऱ्या पक्षात पसरू शकतो. यामुळे अनेक पक्षांचा मृत्यू होतो. पक्षांसह हा माणसांमध्येही पसरू शकतो. यामुळे एवियन इन्फ्लूएंजा अॅक्शन प्लान-2015 अंतर्गत कारवाई केली जाते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser