आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाचार पिता...:राजस्थान : दिव्यांग मुलास घेऊन जाण्यासाठी, सायकल चोरून माफीचे पत्र

भरतपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'सायकल ठेवलेल्या भागात अनेक महागड्या वस्तू होत्या, परंतु त्याने कशासही हात लावला नाही'

परिस्थितीमुळे लाचार वडिलाचे इमान कसे डगमगू शकते.. त्यांना कशा प्रकारे गुन्हेगार करू शकते.. ? ही बाब बरेलीच्या मोहम्मद इक्बालच्या एका पत्रावरून अनुभवता येऊ शकते. दिव्यांग मुलाला ११५० किमी दूर नेण्यासाठी सायकलची चोरी करणे हा इक्बालचा गुन्हा. हा अपराध करताना इक्बाल यास त्याचा प्रामाणिकपणा गप्प बसू देत नव्हता. त्यामुळेच त्याने सायकल मालकाच्या नावे एक पत्र लिहिले. ‘मी तुमचा अपराधी आहे. मी एक मजूर आहे. लाचार आहे. मी तुमची सायकल घेऊन जात आहे. मला क्षमा करा...’ अशा आशयाचे पत्र त्याने सायकल मालकाच्या नावे लिहिले. 

ही घटना रारह गावातील आहे. सायकलचे मालक साहब सिंह यांना सायकल गायब झाल्याचे समजले. साफसफाई करताना एक चिठ्ठी सापडली. त्यावर इक्बालने आपल्या वेदना लिहिल्या होत्या. इक्बालच्या पत्राने माझे डोळे पाणावले. आधी सायकल चोरीस गेल्याने चिंता व संताप होता, मात्र आता त्याचे समाधानात रूपांतर झाले आहे. माझ्या मनात त्या पित्याविषयी द्वेष नाही. सायकल ठेवलेल्या भागात अनेक महागड्या वस्तू होत्या, परंतु त्याने कशासही हात लावला नाही, अशी प्रतिक्रिया सायकल मालक साहब सिंह यांनी व्यक्त केली.  

मोहम्मद इक्बाल कोठून आला होता, सोबत कोण होते, हे समजू शकले नाही. परंतु जगण्यासाठी आणि घरी परतण्यासाठी जाणाऱ्या हजारो मजुरांपैकी एक होता. 

डिस्क्लेमर : ‘भास्कर’ कोणत्याही परिस्थितीत चोरी वा इतर बेकायदा कामांचे समर्थन करत नाही. 

बातम्या आणखी आहेत...