आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमट्याचे चटके, नाक कापले, मूत्र पाजले:विवाहित व्यक्तीला 'लिव्ह इन'मध्ये राहण्याची अघोरी शिक्षा, तरुणीच्या वडिलांसह 8 जणांवर FIR

टोंक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानच्या टोंक जिल्ह्यात क्रौर्याची परिसीमा गाठण्याची एक घटना उजेडात आली आहे. काही व्यक्तींनी एका तरुणाला जंगलात लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून चपलांची माळ घातली. एवढेच नाही तर गरम चिमट्याचे चटके देऊन त्याचे नाकही कापले. जवळपास 1 डझन लोकांनी मारहाण केली. यात काही महिलांचाही समावेश होता.

पीडित तरुणाला जबरदस्तीने लघवी पाजण्यात आली. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा व्हिडिओही तयार करून तो सोशल मीडियावरही टाकण्या आला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पीडित तरुणाने पोलिसांची मदत घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी 3 आरोपींना बेड्या ठोकून आपला हिसका दाखवला. या प्रकरणी 1 आरोपी अद्याप फरार आहे.

आरोपींनी पीडित कालूला मूत्र पाजले व त्याचे नाक कापले.
आरोपींनी पीडित कालूला मूत्र पाजले व त्याचे नाक कापले.

'लिव्ह इन'ची शिक्षा

प्रकरण टोंक जिल्ह्यातील टोडारायसिंह भागातील आहे. मुडियाकला गावच्या कालू मोग्यासोबत हा अत्याचार झाला. कालू विवाहित आहे. पण त्याची पहिली पत्नी गत 2 वर्षांपूर्वी त्याला सोडून गेली होती. तेव्हापासून कालू आपल्या मुलगा व मुलीसोबत राहत होता. त्याचे गावातीलच एका अविवाहित मुलीशी प्रेमसंबंधही होते. ही तरुणीही आपल्या कुटुंबीयांना सोडून कालूसोबत राहत होती. दिवाळीच्या निमित्ताने ती आपल्या घरी गेली होती. तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी कालू न त्याच्या बहिणीला जंगलात नेऊन अमानुष मारहाण केली.

आरोपींनी कालू व त्याच्या बहिणीला जंगला नेऊन मारहाण केली.
आरोपींनी कालू व त्याच्या बहिणीला जंगला नेऊन मारहाण केली.

पंचायतीने ठोठावली 93 हजारांच्या दंडाची शिक्षा

कालूची प्रेमिका दिवाळीला आपल्या घरी गेल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी 2 दिवसांपूर्वी आपल्या समाजाची पंचायत बोलावली होती. पंचायतीत कालू व त्याची बहीण हजर होते. यावेळी पंचांनी कालूला 5 दिवसांत 93 हजार रुपये मुलीच्या कुटुंबीयांना देण्याचे आदेश दिले. त्यानंतर कालू व त्याची बहीण गावी जाण्यासाठी निघाले. त्यावेळी मुलीच्या नातेवाईकांनी त्यांना पकडून बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर कालूला चपलांची माळ घालण्यात आली. तसेच गरम चिमट्याने चटके देऊन नाकही कापले.

आरोपींनी पीडित कालूला असे चटके दिले.
आरोपींनी पीडित कालूला असे चटके दिले.

पोलिसांत तक्रार करणार नसल्याचे लिहून घेतले

पीडित कालूचा आरोप आहे की, मारहाणीनंतर मुलीच्या नातेवाईकांनी त्याला कोर्टात नेले. तिथे त्याच्याकडून जबरदस्तीने पोलिस केस करणार नसल्याचे लिहून घेतले. तसेच केस केल्यास 5 लाख 51 हजार रुपयांचा दंड द्यावा लागेल, अशी धमकीही दिली. पीडित तरुणाने मुलीच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मालपुराचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक राकेश कुमार बैरवा यांनी या प्रकरणी नवर्तन, गीता, सावित्री, शंकर, पारस, हेमराज, संतरा व गोवर्धन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले. यापैकी पारस, हेमराज व शंकरला अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...