आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाच्या वाढत्या आकड्यांच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सदृश्य निर्बंधांची वेळ आली आहे. महाराष्ट्रासह देशभर कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावरून दिल्लीनंतर आता राजस्थानात सुद्धा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. येत्या 7 जानेवारीपासून हे निर्बंध लागू केले जाणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून जारी करण्यात आली आहे. तर राजधानी जयपूरमध्ये आठवी वर्गापर्यंतच्या सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी सुद्धा 9 जानेवारीपासून कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत.
...तर 10 हजार रुपयांचा दंड
राज्यातील सामाजिक, राजकीय आणि कुठल्याही समारंभात आता 100 पेक्षा अधिक लोकांना एकत्रित येता येणार नाही. लग्नात सुद्धा हेच नियम लागू असतील. अंत्यविधीसाठी केवळ 20 जणांची मर्यादा असेल. यापेक्षा अधिक लोक दिसून आल्यास 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. राजस्थानमध्ये राज्यभरात शाळा बंद करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. तरीही स्थानिक आणि जिल्हा पातळीवर प्रशासनाकडून शाळा बंद केल्या जात आहेत.
लग्न-सोहळ्यांसाठी प्रशासनाची मंजुरी आवश्यक
लग्न समारंभ आयोजित करण्यासाठी आता त्या-त्या स्थानिक पातळीवर उप-विभागीय जिल्हाधिकारी स्तरावर पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. ही माहिती डीओआयटी वेबसाईटवर उपलब्ध राहील. त्यावरूनच मंजुरी सुद्धा दिली जाणार आहे. परवानगी न घेता अशा कार्यक्रमांचे आयोजन केल्यास दंड वसूल करण्यासह कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. यासोबतच राज्यात नाइट कर्फ्यू देखील लागू करण्यात आला आहे.
धार्मिक स्थळांवर प्रसाद, पूजा सामुग्रीवर निर्बंध
धार्मिक स्थळांवर पूजा सामुग्री, चादर आणि प्रसादसह इतर वस्तूंवर निर्बंध लादण्यात आले आहेत. धार्मिक स्थळांवर व्हॅक्सीनचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाच दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. यावेळी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे.
परराज्यातून येणाऱ्यांचे व्हॅक्सीनेशन आवश्यक
परदेशातून येणाऱ्यांना विमानतळावर आरटीपीसीआर टेस्ट करून घ्यावी लागेल. निगेटिव्ह रिपोर्ट येत नाही तोपर्यंत क्वारंटाइन राहावे लागेल. दुसऱ्या राज्यांतून येणाऱ्यांना व्हॅक्सीनेशनचे दोन्ही डोस आवश्यक आहेत. दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र नसेल तर विमानतळ आणि रेल्वे स्टेशनवरच चाचणी केली जाईल. निगेटिव्ह रिपोर्ट येईपर्यंत क्वारंटाइन राहावे लागेल.
लसीकरणाशिवाय बाहेरच पडता येणार नाही
राजस्थानात येत्या 1 फेब्रुवारी 2022 पासून दोन्ही डोस घेतल्याशिवाय कुठेही प्रवेश मिळणार नाही. कुठल्याही कार्यालयात, बाजारात, सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक वाहतूक सेवा या सर्व ठिकाणी दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवावेच लागेल. एवढेच नव्हे, तर व्हॅक्सीन न घेतलेल्यांना घराबाहेरच पडू द्यायचे नाही यासाठी गृहमंत्रालय वेगळा आदेश जारी करण्याच्या तयारीत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.