आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rajasthan Political Crisis 20 July News And Updates | Sachin Piolat, Ashok Gahalot, Congress, Bjp

राजस्थान पेच:मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचाच ऑडिओत आवाज : अजय माकन

जयपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सचिन पायलटांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा... हायकोर्टात सुनावणी

राजस्थानातील राजकीय पेचावर दहाव्या दिवशीही फोन टॅपिंगचाच मुद्दा वरचढ राहिला. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू राहिले. रविवारी काँग्रेस आमदार राजेंद्र गुडा यांनी दावा केला की, एसओजीने अटक केलेले संजय जैन यांनी त्यांची आठ महिन्यांपूर्वी भेट घेतली होती. जैन यांनी माजी मुख्यमंत्री वसंुधराराजे आणि इतर नेत्यांची भेट घेण्यास सांगितले होते. असे अनेक एजंट आहेत. मात्र, त्यांचे मनसुबे यशस्वी झाले नाहीत. दरम्यान, आमदारांना आमिषे दाखवणारा पुरावा म्हणून जाहीर झालेल्या ऑडिओत केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचाच आवाज असल्याचा दावा काँग्रेस नेते अजय माकन यांनी केला.

बंडखोरांवर बंदी घाला : सिब्बल 

काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी लोकप्रतिनिधी कायद्यात दुरुस्ती करावी, असे सांगून दलबदलूंवर पाच वर्षे सरकारी पद किंवा पुढील निवडणूक लढवण्यास बंदी घातली जावी, अशी मागणी केली.

आजचा दिवस महत्त्वाचा... हायकोर्टात सुनावणी : 

पायलट यांच्यासह १९ आमदारांना बजावण्यात आलेल्या अपात्रतेच्या मुद्द्यावर हायकोर्ट सकाळी १० वाजता सुनावणी करेल. निकाल विरोधात गेला तर या आमदारांवर अपात्रतेची तलवार लटकती राहील. बाजूने निकाल लागला तर आमदारकी वाचेल आणि सचिन पायलट यांची शक्ती वाढेल.