आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rajasthan Political Crisis | Center Asks CS To Answer On Phone Tapping, Pilot Camp Missing When SOG Reaches Delhi

राजस्थान पेच:गुडगाव-मानेसरमध्ये 18 बंडखोर आमदारांचा एसओजीला गुंगारा; आमदारांच्या आवाजाचे नमुने घेणार

जयपूर/नवी दिल्ली/गुडगाव2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आतापर्यंत गेहलोत सरकारला ओलिस घेतल्याचा आरोप करणारे बीटीपीचे आमदार राजकुमार रोथ आणि रामप्रसाद यांनी सीएम गहलोत यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा दिल्याचे पत्र दिले. - Divya Marathi
आतापर्यंत गेहलोत सरकारला ओलिस घेतल्याचा आरोप करणारे बीटीपीचे आमदार राजकुमार रोथ आणि रामप्रसाद यांनी सीएम गहलोत यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा दिल्याचे पत्र दिले.
  • नमुना देण्यास 2 भाजप नेत्यांचा नकार, संजय जैनला 4 दिवसांची कोठडी

राजस्थानात सरकार पाडण्याच्या षड््यंत्रात आमदारांच्या खरेदी-विक्रीशी संबंधित जाहीर ऑडिओवरून शनिवारी बरीच राजकीय उलथापालथ होत राहिली. भाजप नेते अशोक सिंह आणि भरत मालाणी यांनी तपासणीसाठी आपल्या आवाजाचा नमुना देण्यास नकार दिला. दुसरीकडे, अटकेतील भाजप नेते आणि मध्यस्थ संजय जैनला जयपूर न्यायालयाने चार दिवसांची एसओजी कोठडी सुनावली. आतापर्यंत शांत असलेल्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनीही मौन सोडले. काँग्रेसच्या अंतर्गत वादाचे फटके लोकांना सहन करावे लागत असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, बंडखोर १८ आमदारांच्या आवाजाचे नमुने घेण्यासाठी मानेसरला गेलेल्या एसओजीच्या पथकाच्या हाती एकही आमदार लागला नाही.

फोन टॅपिंगची परवानगी घेतली हाेती का : भाजप

भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी ऑडिअोच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, गहलोत सरकार सांगत आहे की, हे ऑडिअो पूर्णपणे खरे आहेत. राजस्थानात राजकीय पक्षाच्या लोकांचे फोन टॅप केले जात आहेत का? हे कायदेशीर आहे का?

आमदारांचे हॉटेलमध्ये योग, स्वयंपाकाचाही सराव

जयपूरच्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये असलेले गहलोत गटाचे आमदार वेळ घालवण्यासाठी योगा, स्वयंपाक करण्याचा सरावही करत आहेत. तसेच चित्रपट पाहणे, कॅरम खेळण्यासह इतर खेळांत वेळ घालवत आहेत.

राष्ट्रपती राजवट लागू करा : मायावती

बसप नेत्या मायावतींनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केल्याचा आरोप करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली, तर भाजपने टॅपिंगची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

मानेसरमधून आमदारांना कर्नाटकला पाठवले : काँग्रेस

काँग्रेसने शनिवारी भाजपवर आरोप केला की, एसओजीचे पथक हरियाणातील मानेसरमधील हॉटेलमध्ये गेले असताना आमदारांच्या आवाजाचे नमुने घेऊ दिले नाहीत. प्रवक्ते पवन खेडा म्हणाले, आमदारांना हॉटेलच्या मागच्या दाराने बाहेर काढण्यात आले. १८ आमदारांना मानेसरहून कर्नाटकात पाठवण्यात येणार आहे. मात्र, गुडगावमधील सूत्रांनी सांगितले की, आमदार तेथेच आहेत. हे लोक शनिवारी इतरत्र भटकत राहिले.

गहलोतांच्या निकटवर्तीयांकडे १२ कोटी रोख : 

मुख्यमंत्री गहलोत यांच्या निकटवर्तीयांकडील छाप्यात प्राप्तिकर विभागाला १२ कोटी रोख, १ कोटी ७० लाखांचे दागिने तसेच काही मालमत्तांची कागदपत्रे सापडल्याने खळबळ उडाली आहे.

बातम्या आणखी आहेत...