आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rajasthan Political Crisis Latest News And Updates | Conspiracy To Buy MLAs, Treason Against Minister Gajendra Singh

राजस्थान पेच:आमदार खरेदीचे षड्यंत्र, मंत्री गजेंद्रसिंहांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा; चौकशीसाठी राजस्थान पोलिस हरियाणात, आमदार मात्र बेपत्ता!

जयपूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरियाणाच्या मानेसरमध्ये समर्थक आमदारांसोबत पायलट थांबले हाेते. राजस्थान पोलिस येथे दाखल झाले, पण हरियाणा पोलिसांनी त्यांना रोखले. दीड तासाने त्यांना प्रवेश दिला खरा, परंतु तोवर आमदार बेपत्ता होते. - Divya Marathi
हरियाणाच्या मानेसरमध्ये समर्थक आमदारांसोबत पायलट थांबले हाेते. राजस्थान पोलिस येथे दाखल झाले, पण हरियाणा पोलिसांनी त्यांना रोखले. दीड तासाने त्यांना प्रवेश दिला खरा, परंतु तोवर आमदार बेपत्ता होते.
  • राजस्थानात आमदार खरेदीशी संबंधित ऑडिओ बाहेर आल्यावर शुक्रवारी 5 घटना घडल्या
  • आणखी काही ऑडिओ बाहेर येतील...केंद्रीय मंत्र्यांना तत्काळ अटक करा : काँग्रेस

राजस्थानात आमदार खरेदीशी संबंधित ऑडिओ बाहेर आल्यावर शुक्रवारी ५ घटना घडल्या. घटनाक्रम असा...

पहिला : पोलिसांनी ऑडिओआधारे गजेंद्रसिंह, दलाल संजय जैन व काँग्रेस आमदार भंवरलाल शर्मांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवला. यात गजेंद्र हे नाव आहे, पण ते नेमके कोण हे नमूद नाही. ऑडिओतील आवाज केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचा असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. गजेंद्रसिंह यांनी तो बनावट असल्याचा दावा केला. 

दुसरा : काँग्रेसने आ. विश्वेंद्र सिंह व भंवरलाल शर्मांना निलंबित केले. 

तिसरा : दलाल संजय जैन याला अटक. 

चौथा : एसओजीचे पथक हरियाणाच्या मानेसरमध्ये पायलट समर्थकांच्या चौकशीसाठी पोहोचले. मात्र, हरियाणा पोलिसांनी अडवले. जेव्हा आत सोडले तोवर आमदार बेपत्ता होते. 

पाचवा : सभापतींनी बजावलेल्या अपात्रतेच्या नोटिशीला हायकोर्टाने मंगळवारपर्यंत स्थगिती दिली.

७ दिवसांच्या घटनाक्रमानंतरही वसुंधराराजे यांचे अद्याप मौनच

माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी अद्याप मौन बाळगले आहे. आमदार खरेदीबाबतचा कथित ऑडिओ बाहेर आल्यावरही त्यांचे मौन कायम आहे. भाजपचा सहकारी रालोपाचे नेते हनुमान बेनिवाल यांनी आरोप केला होता की, गहलोत सरकार वसुंधरा वाचवत आहेत.

...पायलट यांना हायकोर्टाचा दिलासापायलट-आमदारांच्या अपात्रतेच्या नोटिशीला २१ जुलैपर्यंत स्थगिती

विधानसभा सभापती सी. पी. जोशी यांच्या वतीने बंडखोर सचिन पायलट व १८ आमदारांना दिलेल्या अपात्रतेच्या नोटिशींवर हायकोर्टाने २१ जुलैपर्यंत स्थगिती दिली. पुढील सुनावणी २० रोजी होईल. बंडखोरांच्या वतीने हरीश साळवे यांनी व्हीसीतून लंडनहून बाजू मांडली. सभापतींच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी उपस्थित होते.

आणखी काही ऑडिओ बाहेर येतील...केंद्रीय मंत्र्यांना तत्काळ अटक करा, पायलट यांनी समोर यावे : काँग्रेस

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी या प्रकरणात केंद्रीय मंत्र्यांना अटक करावी, अशी मागणी केली. २५-३५ कोटी रुपयांत भाजप आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न सुरू होता. या प्रकरणाच्या तपासात केंद्रीय मंत्री हस्तक्षेप करून दबाव आणू शकतात. त्यांना अटक करावी. या प्रकरणी सचिन पायलट यांनी स्पष्टीकरण द्यावे, असे सुरजेवाला म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...