आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राजकीय उत्सुकता कायम:भाजपमध्ये जाणार नाही, हे लोक मला बदनाम करत आहेत : पायलट; सरकार पाडण्यासाठी ते सरसावले, 20 कोटींचा सौदा होता : गहलोत

नवी दिल्ली/जयपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पायलट नरमले, मुख्यमंत्री गहलोत यांनी चांगलेच सुनावले

राजस्थानात सुरू असलेल्या राजकीय पेचात बुधवारी सचिन पायलट नरमले. एका मुलाखतीत ते म्हणाले, काही लोक मला हायकमांडच्या नजरेत बदनाम करू पाहत आहेत. म्हणून मी पक्ष बदलणार असल्याच्या अफवा उठताहेत. दुसरीकडे, मुख्यंमत्री अशोक गहलोत म्हणाले की, पायलट भाजपशी हातमिळवणी करून सरकार पाडू पाहत होते. २० कोटींचा हा सौदा होता. पुरावेही आहेत. दरम्यान, रणदीप सुरजेवाला म्हणाले, पायलट यांनी हरियाणा सरकारचा पाहुणचार सोडून परतावे. दरम्यान, एनएसयूआयच्या बैठकीत राहुल गांधी म्हणाले, ज्याला पक्ष सोडून जायचे आहे तो जाईल. नवीन लोकांना तरी संधी मिळेल. पायलटविरुद्ध कडक विधाने करू नका, असा सल्लाही त्यांनी नेत्यांना दिला.

मला स्वाभिमान परत हवाय : पायलट; यांना कष्टच पडलेले नाहीत : गहलोत

> मुख्यमंत्रिपदासह मला कोणतीच लालसा नाही. माझा गहलोत यांच्यावर रागही नाही किंवा मला एखाद्या पदाचा अधिकारही नको आहे. मला पक्षात पुन्हा स्वाभिमान हवाय.

> काम करू देत नव्हते. अधिकारी ऐकत नव्हते. आश्वासने पूर्ण करू शकत नसाल तर पदाचा काय उपयोग?

> भाजप नेत्यांना भेटलो नाही. ६ महिन्यांपासून ज्योतिरादित्य किंवा भाजप नेते ओम माथूर यांची भेट झालेली नाही.

> राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडल्यापासून गहलोत व त्यांचा गट मला असे काही करण्यास उद्युक्त करत होता. पोलिसांनी नोटीस बजावली, यात राजद्रोहाचे आरोप होते.

> सीएम गहलोत म्हणताहेत, सरकार सुरक्षित, 109 आमदार सोबत. तिसऱ्या दिवशीही आमदार टिकवण्याची धडपड.

> पायलट काँग्रेस सोडण्याच्या मन:स्थितीत दिसले नाहीत. मात्र, स्पष्ट सांगतही नाहीत. सध्या २२ आमदार पाठीशी.

> भाजपचे वेट अँड वॉच. नेते बैठका घेत आहेत. मात्र, काँग्रेसमधील या वादावर अगदी सावध प्रतिक्रिया.

> सोन्याची सुरी खाण्यासाठी नसते. चांगले इंग्रजी बोलणे आणि स्मार्ट दिसल्याने काही होत नाही. मनात काय आहे, निष्ठा किती आहे हे सगळे पाहिले जाते.

> आरोप चुकीचे आहेत. मी अधिकाऱ्यांना कधीच हे आदेश दिले नाहीत. न सांगता पायलट लंडन, दिल्ली व इतरत्र जात होते.

> सरकार पाडण्याचे षड््यंत्र भाजपशी हातमिळवणी करून सुरू होते. पुरावे आहेत. रात्री २ वाजता लोक पाठवले जात होते.

> नव्या पिढीला उद्याचे पडले आहे. आमचे ४० वर्षांपूर्वीचे नेतृत्व तावून -सुलाखून निघाले आहे. यांना कष्ट कुठे पडलेत... केंद्रात मंत्री झाले! तसे असते तर चांगले काम केले असते.

पुढे काय : ३६ आमदार फुटले तर नवा पक्ष स्थापून भाजपसोबत सरकार शक्य

1. काँग्रेसमध्ये परत

शक्यता आहे. परंतु, गहलोत यांची आक्रमक भूमिका पाहता पायलट यांचे परतीचे मार्ग जवळपास बंद. परतले तरी राजस्थानात सक्रिय राहणे अशक्य.

2. भाजपत प्रवेश हा पर्याय खुला आहे. परंतु, भाजप प्रवेशाची शक्यता त्यांनी नाकारली आहे. स्थानिक समीकरणे पाहता समर्थक आमदारांचा भाजप प्रवेशास विरोध.

3. नवा पक्ष

काँग्रेसच्या १०७ पैकी ३६ आमदार फोडून वेगळा पक्ष स्थापन करू शकतात. भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होऊ शकतात. सध्या हीच शक्यता अधिक.