आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rajasthan Political Crisis News And Updates | Pilot's Group Now Includes 22 MLAs, Previously Claiming 30, With 25; All Three Left Together!

राजस्थानचे रण..:पायलट यांच्या गटामध्ये आता 22 आमदार, आधी 30 चा दावा, 25 सोबत; तिघांनी सोडली साथ !

जयपूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोठा प्रश्न : सचिन ‘उड्डाण’ का करू शकले नाहीत?, गहलोत मात्र निवांत दिसले

काँग्रेसमध्ये बंडाचे निशाण उभारणारे विद्यमान प्रदेशाध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आपल्या पाठीशी ३० पेक्षा जास्त आमदार असल्याचे म्हटले होते. परंतु ही संख्या नंतर २५ वर आली. त्यातही तीनने साथ सोडली. आता ३ अपक्षांसह २२ आमदार त्यांच्या बाजूने उरले आहेत. त्यांचा पाठिंबा एवढा घटला कसा? या विचाराने खुद्द पायलट यांच्यासह मानेसरमधील त्यांचे समर्थकही बुचकळ्यात पडले आहेत. सद्य:स्थितीनुसार सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी पुरेसे संख्याबळ पायलट यांच्या गटाकडे नाही. परंतु तूर्त तरी ‘दिसते तसे नसते आणि नसणारी गोष्टही कशी घडू शकते,’ हे राजकीय सूत्र राज्यातील घडामोडींकडे पाहिल्यास जाणवते. त्यामुळेच पुरेसे संख्याबळ केव्हाही जमवू असे पायलट गोटाला वाटते.

पायलट यांना सर्वाधिक अपेक्षा परिवहनमंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांच्याकडून होती. कारण अनेक दिवसांपासून ते खांद्याला खांदा लावून काम करत होते. परंतु ऐनवेळी त्यांनी झटका दिला. आधी अनेक आमदारांची नावे घेतली जात होती. परंतु आता ते सर्व आमदार गहलोत गटात ठाण मांडून आहेत. त्यांच्याशिवाय इतर आमदारही असू शकतात. मात्र त्याबाबत चर्चा होत नाही.

अपक्ष, माकपचाही पाठिंबा नाही

राज्यातील एकूण १३ अपक्षांपैकी निम्म्या आमदारांचा पाठिंबा मिळेल, अशी पायलट यांच्या समर्थकांना अपेक्षा होती. बीटीपीचे दोन आमदार तटस्थ राहिले. माकपच्या एका आमदाराने उघडपणे गहलोत यांना पाठिंबा दिला.

अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांचा राजकीय प्रवास

अशोक गहलोत : पाच वेळा खासदार, पाच वेळा आमदार, इंदिरांनी आणले राजकारणात

राजस्थानात ‘राजकारणाचे जादूगार’ म्हणून परिचित अशोक गहलोत यांनी २०१८ च्या विधानसभेत काँग्रेसला बहुमताचा आकडा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यांना ‘मारवाड का गांधी’ असे मानणारा एक वर्ग आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना राजकारण आणले.

> गहलोत यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात १९७४ मध्ये एनएसयूच्या अध्यक्षाच्या रूपाने झाली होती. १९७९ पर्यंत ते पदावर.

> गलहोत १९७९ ते १९८२ पर्यंत काँग्रेस जोधपूर जिल्हाध्यक्ष पदावर होते. १९८२ मध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राहिले. १९८० मध्ये ते खासदार झाले.

> गहलोत १९८० ते १९९९ पर्यंत पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले. गहलोत १९९९ पासून जोधपूरच्या सरदारपुरा विधानसभेचे प्रतिनिधित्व करत आहेत. ते चार वेळा आमदार म्हणून विजयी झाले.

> पाच वेळा खासदार. पाचव्यांदा आमदार झाले. १९८२-१९८३ पर्यंत पर्यटन उपमंत्री व १९८३-८४ मध्ये नागरी उड्डाण, १९८४ क्रीडा उपमंत्री.

सचिन पायलट : तरुण खासदार, ३१ व्या वर्षी केंद्रीय मंत्री, वडिलांसारखे गावोगावी फिरतात

राजस्थानमध्ये काँग्रेसचे अशोक गहलोत यांच्याविरोधात बंडाचा झेंडा लावणारे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट राजकीय जीवनाच्या १७ वर्षांच्या प्रवासात सर्वात मोठ्या वळणावर उभे आहेत. सचिन पायलट यांनी केंद्रीय मंत्रिपदापासून राजस्थानच्या प्रदेश अध्यक्ष व ४१ व्या वर्षी उपमुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचले.

> २०१४ मध्ये राजस्थान प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष झाले.

> २००९ मध्ये दूरसंचार व आयटीसाठी केंद्रीय राज्यमंत्री झाले. २०१२ मध्ये उद्योगविषयक विभागाचे ते राज्यमंत्री बनले.

> २००४ मध्ये गृहविषयक प्रकरणात लोकसभेच्या स्थायी समितीचे सदस्य व २००६ मध्ये नागरी उड्डाण मंत्रालयात सल्लागार समितीचे सदस्य. २६ व्या वर्षी निवडून आलेले सर्वात तरुण खासदार ठरले.

> २०१८ मध्ये टाेंकचे आमदार.  > ७ सप्टेंबर १९७७ मध्ये सहारनपूर येथे जन्म. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांची मुलगी सारासोबत विवाह. त्यांना दोन मुले.

> ११ जून २००० मध्ये वडील राजेश पायलट यांच्या निधनानंतर २००२ मध्ये काँग्रेसमध्ये सक्रिय.

आता भाजपकडील पर्याय

तूर्त भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. अजूनही पक्षाने पत्ते उघडले नाहीत. मात्र भाजपकडे दोन पर्याय शिल्लक आहेत.

पहिला : विधानसभेत एकूण २०० आमदार आहेत. पैकी सर्वाधिक १०७ काँग्रेसकडे आहेत. ३३ आमदारांनी पक्ष सोडल्यास संख्या ७४ होईल. या स्थितीत काँग्रेस अल्पमतात येईल. तेव्हा भाजप व आरएलपी ७५ आमदारांसह सरकार स्थापनेचा दावा करू शकतात. बीटीपी व अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करेल. तेव्हा बहुमतासाठी ८४ आमदारांची गरज भासेल. तेव्हा काँग्रेसला १०, भाजपला नऊ आमदारांची गरज असेल.

दुसरा : सचिन यांनी काँग्रेसच्या १०७ पैकी ३६ आमदारांना फोडून नवा पक्ष स्थापन केल्यास भाजप त्यांना बाहेरून पाठिंबा देऊन सरकार स्थापन करू शकते.

तिसरा : काँग्रेसच्या २५ आमदारांनी राजीनामा दिल्यास व भाजप अपक्षांना गटात घेण्यात यशस्वी ठरल्यास किंवा दोन्ही पक्ष आकडेवारीत अडकल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. कारण केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे केंद्राच्या इशाऱ्यावर राज्यपाल हे पाऊल उचलू शकतात.

बातम्या आणखी आहेत...