आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rajasthan Political Crisis Supreme Court Hearing: Sachin Pilot Vs Gehlot In SC Over Speaker CP Joshi Petition

राजस्थानातील पेच:मतभेद दडपता येणार नाहीत, अशाने लोकशाही संपेल : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
सभापती सीपी जोशी (डावीकडे) यांच्या याचिकेसह पायलट गटानेही सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिट दाखल केली. - फाइल फोटो
  • हायकोर्टाच्या निकालास स्थगिती मिळवण्यात सभापतींना अपयश

राजस्थानातील राजकीय पेचावर उच्च न्यायालय शुक्रवारी निकाल देईल. सभापती सी. पी. जोशी यांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर सुप्रीम कोर्टात केलेले अपील ग्राह्य धरले नाही. अपात्रतेच्या नोटिसांवर सचिन पायलट यांच्यासह काँग्रेसच्या १९ आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्ट आदेश देऊ शकते, असे सुप्रीम कोर्टाने नमूद केले. हायकोर्ट सभापतींना अपात्रतेची कारवाई करण्यापासून रोखू शकत नाही, असा सभापतींचा युक्तिवाद होता. मात्र, सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की, लोकशाहीत मतभेद दडपून टाकता येणार नाहीत. यामुळे लोकशाही संपेल. दरम्यान, पुढील सुनावणी २७ जुलैला होईल. सभापती सी. पी. जोशी यांच्या याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्ती अरुण मिश्रा, बी. आर. गवई आणि कृष्ण मुरारी यांच्या पीठाने व्हीसीद्वारे सुनावणी केली. सभापतींच्या वतीने कपिल सिब्बल आणि पायलट यांच्या गटाकडून मुकुल राेहतगी उपस्थित झाले.

मला अशा दु:खाची सवय झालीय : सिब्बल

सुनावणीदरम्यान मोकळेपणाने चर्चा झाली. सिब्बल युक्तिवाद करत असताना न्या. मिश्रांनी विचारले, तुम्ही दु:खात का दिसता? यावर सिब्बल म्हणाले, मी दु:खात नाही... पण अॅड. साळवे हसत आहेत. तशी सध्या मला दु:खाची सवय झाली आहे. ही चर्चा नंतर येथेच थांबली.

मंत्री शेखावत यांच्याविरुद्ध चौकशीचे आदेश : 

जयपूरच्या एका न्यायालयाने पतसंस्था घोटाळ्यात केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. काँग्रेसने शेखावत यांच्यावर राज्य सरकार पाडण्याचे षड‌्यंत्र रचण्याचेही आरोप केले होते. एक ऑडिओच्या चौकशीसाठी एसओजीने त्यांना नोटीस पाठवली आहे.