आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rajasthan Political Crisis Update | Rajasthan Congress MLA Meeting Today Latest News: Rajasthan Chief Minister Ashok Gehlot Vs Sachin Pilot Camp MLa

राजस्थानमध्ये गहलोत vs पायलट:सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी

जयपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बंडखोरीच्या प्रयत्नात असलेले सचिन पायलट गट म्हणाले - आमच्याजवळ 30 पेक्षा जास्त आमदार, सरकारने बहुमत सिद्ध करावे

सचिन पायलट यांच्यासाठी काँग्रेसचे दरवाजे आता बंद झाले आहेत. मागील तीन दिवसांपासून त्यांची मनधरणी करण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर काँग्रेसने आता ऍक्शन घेतली आहे. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, त्यांचे समर्थक मंत्री विश्वेन्द्र सिंह आणि रमेश मीणा यांनाही हटविण्यात आले आहे. सचिन यांच्या जागेवर आता गोविंद सिंह डोटासरा यांना राजस्थान प्रदेश काँग्रेस कमेटीचे नवीन अध्यक्ष बनवण्यात आले आहे. तिकडे गणेश गोगरा या आमदाराला प्रांत युवा काँँग्रेस आणि हेम सिंह शेखावत यांना प्रदेश सेवा दलचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 

या बैठकीनंतर कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, 'राजस्थानातील शूर लोकांनी निवडलेल्या कॉंग्रेसचे सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपने कट रचला आहे. सत्ता आणि सत्तेचा गैरवापर, ईडी आणि आयकर विभागाचा गैरवापर यापासून कॉंग्रेस व अपक्ष आमदारांना खरेदी करण्याचा भाजपने प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री गहलोत यांनी आमदार खरेदीसाठी कसे प्रयत्न सुरू आहेत हे सांगितले. सचिन पायलट आणि काही सहकारी गोंधळात पडले आणि ते भाजपाच्या जाळ्यात अडकले आणि भाजपाच्या कटात सामील झाले. ज्या प्रकारे आमदारांना खट्टर जीच्या पोलिसांच्या संरक्षणाखाली मानेसरमधील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

गेल्या 72 तासांपासून सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कॉंग्रेस नेत्यांनी सचिन पायलट आणि अन्य सहकारी मंत्री आणि आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेस नेतृत्वाने सचिन पायलटशी वारंवार  बोलण्याचा प्रयत्न केला. केसी वेणुगोपाल सचिन पायलटशी बर्‍याच वेळा बोलले.

आजही पाहिली पायलट यांची वाट, ही बैठक एका तासाने पुढे ढकलण्यात आली
राजस्थानमधील गहलोत सरकारवरील संकट मंगळवारी पाचव्या दिवशीही कायम आहे. काल दिवसभर राजकीय नाट्य सुरूच होते. आजही तशीच परिस्थिती आहे. सकाळी 10.30 वाजता सुरू होणारी विधिमंडळ पक्षाची बैठक 11.30 वाजता सुरू झाली. बंडखोरीवर उतरलेले उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांची वाट पाहिल्याचे सांगण्यात आले. याआधई पायलट यांना या बैठकीसाठी आमंत्रण पाठवले होते. पायलट गटाने बैठकीला येण्यास पुन्हा नकार दिला. 

बैठकीत सहभागी न झालेल्या आमदारांविरोधात एक ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावांतर्गत या आमदारांना नोटीस बजावण्यात येणार असून शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. या बैठकीत सचिन पायलट यांना पक्षातून काढून टाकण्यास सर्व आमदारांनी एकमताने सहमती दर्शविली.

याआधी सोमवारी मुख्यमंत्री निवासस्थानावर दुपारी एक वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक झाली होती. यातही सर्वानुमते ठराव संमत करत बैठकीस उपस्थित नसलेल्या आमदारांवर कठोर कारवाई करावी व त्यांना बरखास्त करावे, अशी मागणी केली होती.

यापूर्वी सोमवारी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आपल्या आमदारांची परेड केली होती. या दरम्यान ते म्हणाले की आमच्याकडे बहुमत (101 आमदार) पेक्षा जास्त 109 आमदार आहेत. दरम्यान पायलट यांनी सोमवारी संध्याकाळी आपल्या आमदारांचा व्हिडिओही प्रसिद्ध केला होता. ते म्हणाले की, त्यांच्याकडे 19 आमदार आहेत. मात्र, व्हिडिओमध्ये 17 आमदारच दिसले. पायलट यांच्या गटाने म्हटले की, गहलोत सरकार हे अल्पमतात आहे, त्यांनी बहुमत सिद्ध करावे. गहलोत गटातील आमदार हे जयपूरजवळील कुकसमधील फेअर माउंट हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्याचबरोबर पायलट गटाचे आमदार हरियाणाच्या मानेसरमध्ये थांबले आहेत. 

अपडेट्स 
राजस्थान कॉंग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांनी मंगळवारी सकाळी सांगितले की, आम्ही सचिन पायलट यांना दुसरी संधी देत आहोत. त्यांना आज विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. मला आशा आहे की, आज सर्व आमदार येतील आणि राजस्थानच्या लोकांनी ज्यांना मतदान केले आहे त्या नेतृत्वाला पाठिंबा देतील. आम्ही सर्व राजस्थानच्या विकासासाठी काम करु इच्छितो.

राहुल गांधी, प्रियांका गांधींनी संपर्क साधला पण पायलट समझोत्यासाठी तयार नाही

काँग्रेसकडून पायलट यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सोमवारी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशिवाय पी. चिदंबरम आणि के सी वेणुगोपाल यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. कॉंग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, पायलट हे समझोत्यासाठी तयार झाले नाहीत. राहुल गांधींशी भेट घेण्यासही त्यांनी नकार दिला. दरम्यान सूत्र दावा करत आहेत की, पायलट यांनी नेतृत्वापुढे चार अटी ठेवल्या आहेत. यामध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद कायम ठेवण्याबरोबरच गृह व वित्त विभाग देण्याच्या मागणीचा समावेश आहे. दुसरीकडे, पायटल हे थेट बोलण्या किंवा ट्वीट करण्याऐवजी ते निकटवर्तीयांकडून आपले मत मांडत आहेत. जेणेकरून त्यांच्याविरोधात पक्षविरोधी कारवाई होणार नाही. 

विधिमंडळ पक्ष बैठकीतून 19 आमदार गायब 

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दुपारी एक वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक झाली होती. यामध्ये सर्वसम्मतीने ठराव मंजूर करुन बैठकीत न येणाऱ्या आमदारांवर कडक कारवाई करण्याची आणि त्यांना बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली. पायलट गटाचा असा दावा आहे की विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत न पोहोचलेल्या आमदारांमध्ये दीपेंद्रसिंह शेखावत, राकेश पारीक, जीआर खटाणा, मुरारीलाल मीना, गजेंद्रसिंग शक्तिवत, इंदराजसंह गुर्जर, भंवर लाल शर्मा, विजेंद्र ओला, हेमाराम चौधरी, पीआर यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त मीना, रमेश मीणा, विश्वेन्द्र सिंह, रामनिवास गावडिया, मुकेश भाकर, सुरेश मोदी, हरीश मीना, वेद प्रकाश सोलंकी आणि अमरसिंह जाटव यांचा समवेश आहे. यांच्या व्यतिरिक्त ज्या तीन आमदारांना काँग्रेसने आपल्या संबद्धता सूचीमधून हटवले होते, त्यांच्यासह जवळपास 30 आमदार आमच्याकडे आहेत. 

राजस्थानच्या विधानसभेतील सध्याची स्थिती : एकूण सीट 200

पक्षआमदारांची संख्या
काँग्रेस107
भाजपा72
अपक्ष13
आरएलपी3
बीटीपी2
लेफ्ट2
आरएलडी 1

राजस्थान विधानसभेतील पक्षाची स्थिती पाहिल्यास कॉंग्रेसकडे 107 आमदार आहेत. सरकारला 13 पैकी 10 अपक्ष आणि राष्ट्रीय लोक दलाच्या एका आमदाराचा पाठिंबा आहे. त्यामुळे गहलोत यांना 118 आमदारांचा पाठिंबा आहे. दुसरीकडे, भाजपकडे 72 आमदार आहेत. बहुमत मिळवण्यासाठी किमान 29 आमदारांची आवश्यकता आहे.