आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rajasthan Political Updates: Ashok Gehlot Sachin Pilot Dispute | Power Tussle Between Chief Minister Ashok Gehlot And Rebel Sachin Pilot

राजस्थानात नेमकं का बिनसलं ?:सचिन पायलट यांना समजून सांगण्याचा प्रयत्न झाला, पण ते अशोक गहलोत यांच्या लीडरशिपमध्ये काम करण्यास तयार नाहीत

जयपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, अहमद पटेल, पी. चिदंबरम आणि केसी वेणुगोपाल यांनी अनेकदा पायलट यांच्याशी चर्चा केली

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामधील वाद शमण्यास तयार नाही. मंगळवारी पायलट दुसऱ्यांना आमदारांच्या बैठकीला आले नाही. यानंतर बैठकीत पायलट यांना पक्षातून काढण्याचा प्रस्ताव पास करण्यात आला. त्यानंतर पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्यासह त्यांचे दोन 2 समर्थक मंत्री विश्वेंद्र सिंह आणि रमेश मीणा यांनाही मंत्रीपदावरुन काढण्यात आले. 

खरतर, पायलट आता गहलोत यांच्यासोबत काम करण्यास तयार नसल्याचे त्यांनी हाय कमांडला सांगितले आहे. तर, दुसरीकडे राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, अहमद पटेल, पी चिदंबरम आणि केसी वेणुगोपाल यांनी अनेकदा सचिन पायलट यांच्याशी चर्चा केली, त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतू, पायलट आता मागे हटण्यास तयार नाहीत. 

पायलट यांना मुख्यमंत्री पद हवे होते

आतापर्यंतच्या घटनाक्रमात पायलट आणि गहलोत यांनी एकमेकांचे नाव घेऊन कोणतेच आरोप लावले नाहीत. काँग्रेसचे नेते पायलट यांना समजून सांगत होते, पण पायलट गहलोत यांच्यासोबत काम करण्यास तयार नव्हते. त्यांना मुख्यमंत्रीपद हवे होते. सूत्रांचे म्हणने आहे की, काँग्रेस हाय कमांडला गहलोत यांना पदावरुन हटवण्यास तयार नाही, यानंतर प्रकरण अधिक चिघळले.

या मागण्यांवर हाय कमांडने सहमती दर्शविली

अशी चर्चा आहे की कॉंग्रेस हाय कमांड पायलट कॅम्पच्या काही मागण्या मान्य करण्यास तयार होता. जसे, पायलट समर्थकांना देण्यात आलेल्या एसओजी नोटीस मागे घेण्यात येईल. प्रदेशाध्यक्ष पदावरही पायलट यांना कायम ठेवण्यास तयार होते. पायलट यांच्या नाराजीचे एक कारण असेही सांगण्यात येत आहे की, गहलोत सरकार आणखी एक उपमुख्यमंत्री बनविण्याचा विचार करीत आहे. दुसरा उपमुख्यमंत्री बनवला जाणार नाहीत, अशी ग्वाहीही पायलट यांना काँग्रेसकडून देण्यात आली होती.