आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rajasthan Politics Then Will Meet The President, Agitation In Delhi Ashok Gehlot

राजस्थान पेच:...तर राष्ट्रपतींना भेटणार, वेळप्रसंगी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन : अशोक गहलोत

जयपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंत्रिमंडळाचा सल्ला स्वीकारणे बंधनकारक : अश्विनी कुमार

राजस्थानातील राजकीय नाट्य सलग १६ व्या दिवशीही सुरू होते. राज्यपाल कलराज मिश्रा यांनी विधानसभा अधिवेशन बोलावण्याची मागणी फेटाळल्याच्या निषेधार्थ आंदोलनानंतर शनिवारी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी विधिमंडळ पक्षाची बैठक घेतली. “गरज भासल्यास राष्ट्रपतींकडे जाऊ. वेळप्रसंगी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करू. गरज भासली तर आणखी २१ दिवस हॉटेलमध्ये काढू’, असा इशाराही दिला. यावर आमदारांनी हात उंचावत संमती दर्शवली.

दरम्यान, विधानसभा अधिवेशन घेण्यासंबंधी मंत्रिंमडळाचा नवा प्रस्ताव चार-पाच दिवसांत राज्यपालांना पाठवला जाणार आहे. सोमवारी देशभरात राजभवनासमोर धरणे आंदोलन हाेईल.

मंत्रिमंडळाचा सल्ला स्वीकारणे बंधनकारक : अश्विनी कुमार
माजी कायदा मंत्री अश्विनी कुमार यांनी सांगितले की, राज्यपाल मिश्र मंत्रिमंडळाचा विधानसभा अधिवेशन बोलावण्याचा प्रस्ताव फेटाळू शकत नाहीत. राज्यपाल राज्यात घटनात्मक प्रमुख असतात. ते राज्य मंत्रिमंडळाचा प्रस्ताव मान्य करण्यास बाध्य आहेत. दरम्यान, राज्यसभा खासदार के.टी.एस. तुलसी यांनी म्हटले आहे की, सचिन पायलट आणि समर्थक आमदार पक्षाविरुद्ध षड्यंत्र रचत आहे.