आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएखादा व्यक्ती आपल्या कुटुंबीयांना ठार मारण्यासाठी 1-2 महिन्यांपासून तयारी करतो... गुगलवर सर्च करतो... कुटुंबाला ठार मारल्यानंतर स्वर्गात जाणार की नरकात असा प्रश्न सर्च करतो... पत्नीला ठार मारण्याची इच्छा नसल्यामुळे सरकार तिला किती पेंशन देणार याचीही माहिती काढतो... असे तुम्हाला कुणी सांगितले तर कुणाचाच विश्वास बसणार नाही. पण हो, प्रत्यक्षात असे घडले आहे.
ही कथा जोधपूरच्या लोहावटमध्ये राहणाऱ्या शंकरलालची आहे. त्याने 3 नोव्हेंबर रोजी आपल्या आई-वडीलांसह 2 मुलांचा खून करून आत्महत्या केली. शंकरला सप्टेंबरपासून या हत्याकांडाची तयारी करत होता.
पोलिसांनी शंकरलालच्या मोबाइलची हिस्ट्री पडताळून पाहिली तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. या व्यक्तीने मर्डर व ते करण्याची पद्धत सर्च केली होती. ते पाहून पोलिसही थक्क झाले.
जोधपूरमध्ये 3 नोव्हेंबर रोजी झालेल्या हत्याकांडाची मन पिळवटून टाकणारी कहाणी...
शंकरलालला अफीमची नशा करण्याची सवय होती. त्यातून कुटुंबाला ठार करण्याची सनक त्याच्या डोक्यात बसली. त्याचा पत्नीशीही वाद झाला. कारण, ती वारंवार त्याला टोकत होती. त्याने तिची वेगळे राहण्याची इच्छा असल्याचे सांगितले. अफीमच्या नशेमुळे तो गत सप्टेंबरपासून मर्डरची प्लॅनिंग करत होता.
गुगलवर 2 गोष्टी सर्वाधिक सर्वाधिक सर्च केल्या
1. स्वर्ग मिळेल की नरक
शंकरने आपल्या कुटुंबाला ठार मारण्याचा निश्चय केला होता. हत्या केल्यानंतर काय होईल अशी भीती त्याला वाटत होती. त्यामुळे कुटुंबाला ठार केल्यानंतर आपण स्वर्गात जाणार की नरकात हे तो गुगलवर सर्च करून पाहत होता.
2. झोपेच्या गोळ्या व विष
कुटुंबाला ठार मारण्यासाठी शंकरने प्रथम झोपेच्या गोळ्या व विषारी औषध देण्याचा निर्धार केला होता. यासाठी त्याने झोपेच्या चांगल्या गोळ्या कोणत्या आहेत हे गुगलवर सर्च केले होते. यासोबतच त्याने सर्वात चांगले विष कोणते आहे, हेही त्याने शोधले होते. या झोपेच्या गोळ्या व विष किती वेळात परिणाम करतो याची माहितीही त्याने इंटरनेटवरून गोळा केली होती.
फेसबूक व इंटरनेटवर पाहिले अनेक क्राइम सीरीज
आरोपीने 14 सप्टेंबरपासूनच फेसबूकसह इंटरनेट व अन्य प्लॅटफॉर्मवर क्राइम सीरीज पाहणे सुरू केले होते. सुरुवातीच्या दिवसांत त्याने क्राइम पेट्रोलच्या तीन ते चार सीरीज पाहिले. त्यानंतर त्याने प्लॅन तयार करण्यास सुरुवात केला.
त्याने त्यानंतर अनेक सीरीज पाहिले. जसजसे सीरीजमध्ये मर्डर करण्याची एखादी आयडिया मिळाली तो आपली प्लॅनिरग पुढे सरकवत होता. कुटुंबाला झोपेच्या गोळ्या देऊन ठार मारणे किंवा विष देणे याच प्लॅनिंगचा भाग होता.
पत्नीला मारण्याची इच्छा नव्हती, काळजीने पेंशनची माहिती घेतली
तपासात शंकरचा पत्नीशी वाद सुरू असल्याचेही स्पष्ट झाले. पण त्याची पत्नीला ठार मारण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्याने पतीच्या मृत्यूनंतर विधवांसाठी सुरू असणाऱ्या योजनांची माहिती काढली. तसेच कुटुंबाच्या मृत्यूनंतर सरकार कोणते अर्थसहाय्य देते हे ही त्याने सर्च केले. विशेषतः आपल्या मृत्यूनंतर पत्नीला किती विधवा पेंशन मिळेल याचाही त्याने शोध घेतला.
दोन दिवसांपासून देत होता झोपेच्या गोळ्या
शंकरच्या वहिणीने पोलिसांना सांगितले की, बुधवारी रात्री आरोपीने कुटुंबातील सर्वच सदस्याना झोपेच्या 22 गोळ्या दिल्या. यासाठी त्याने सर्वजण शेतात दिवसभर राबत असल्यामुळे थकत असल्याचे कारण दिले. या गोळ्या सेवन केल्यास चांगली झोप येईल असे त्याचे म्हणणे होते. गुरुवारीही त्याने सर्वांना शिकंजीत झोपेच्या 3 गोळ्या टाकून दिल्या.
3 नोव्हेंबर रोजी कारस्थान अंमलात
शंकरलालने (38) 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी आपले वडील सोनारामवर (65) कुऱ्हाडीने हल्ला करून त्यांना जखमी केले. त्यानंतर तो पळून गेला. काही जणांनी सोनारामला जखमी अवस्थेत रुग्णालात दाखल केले. तिथे त्यांचा मृत्यू झाला.
शंकरने घरातील उर्वरित सदस्यांना झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर सर्वांची शुद्ध हरपल्यानंतर त्याने आपली आई चंपाला (55) घरात बांधलेल्या पाण्याच्या टाकीत फेकून दिले. त्यानंतर जवळच झोपलेला मुलगा लक्ष्मण (14) यालाही टाकीत फेकले. शंकरचा छोटा मुलगा दिनेश (8) आपल्या आईजवळ झोपला होता. सकाळी 5 च्या सुमारास त्यालाही टाकीत फेकले. त्यानंतर स्वतः मामाच्या येथे बांधलेल्या टाकीत उडी घेतली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.