आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोटा येते 6व्या मजल्यावरून पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री 11.15 वा. हा विद्यार्थी आपल्या मित्रांसोबत बाल्कनीत बसला होता. काही वेळाने चारही मित्र उठून जाऊ लागले. यावेळी या विद्यार्थ्याचे पायात चप्पल घालताना बॅलेंस बिघडले. त्यानंतर लगेचच तो बाल्कनीच्या जाळीतून थेट खाली पडला.
डीएसपी अमर सिंह यांनी सांगितले की, मृत इशांशु भट्टाचार्य (20) धुपगुरी, जलपायगुडीचा (पश्चिम बंगाल) होता. तो कोटाच्या जवाहरनगर भागात राहून नीटची तयारी करत होता. त्याचे पार्थीव महाराव भीमसिंह रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या माहितीनुसार इशांशु वात्सल्य रेसीडेंसी हॉस्टेलच्या 6 व्या मजल्यावर राहत होता. तिथे तो गतवर्षी ऑगस्ट महिन्यात आला होता.
डीएसपींनी सांगितले की, या घटनेची माहिती मिळताच इतर विद्यार्थी तिथे पोहोचले. इशांशुला तलवंडी स्थित एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिथे त्याला मृत्त घोषित करण्यात आले. एवढ्या जास्त उंचीवरून पडल्यामुळे त्याचा चेहऱ्याला जबर मार लागला होता.
पोलिसांनी या घटनेची त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली आहे. ते पोहोचल्यानंतर शवविच्छेदन केले जाईल. डीएसपींच्या मते, ही आत्महत्येची घटना नाही. घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही आहे. त्यात विद्यार्थी संतुलन बिघडल्यामुळे पडताना दिसून येत आहे.
बाल्कनीच्या विंडोची उंची कमी व जाळी कमकूवत असल्यामुळे ही घटना घडली. हे वसतीगृह 10 मजली आहे. प्रत्येक मजल्यावर बाल्कनीत अॅल्यूमिनिअमची जाळी लावण्यात आली आहे. बाल्कनीत बसण्यासाठी जागाही आहे. हॉस्टेल संचालकांनी येथे फरशी व जाळीत खूप कमी अंतर ठेवले आहे. जाळ्याही खूप कमकूवत आहेत. त्यामुळे त्या झटक्याने तुटण्याची भीती असते. संचालकांच्या बेजबाबदारपणामुळे एका विद्यार्थ्याचा बळी गेला.
मोबाइल गेम खेळत होते मित्र
इशांशुचा मित्र अभिषेकने सांगितले - आम्ही रिलॅक्स होण्यासाठी मोबाइलवर गेम खेळत होतो. गेम संपल्यानंतर एकमेकांशी चर्चा केली. त्यानंतर पुन्हा अभ्यास करण्यासाठी खोलीत जाऊ लागलो. तेव्हा ही घटना घडली. आम्ही धावत खाली गेलो असता इशांशुच्या डोक्यातून रक्त निघत होते. त्याचा श्वास अडखळत होता. आता यात चूक कुणाची आहे हे मी कसे सांगू. माझा मित्र गेला.
खासगी रुग्णालयाचा भरती करण्यास नकार
अभिषेक म्हणाला - दुर्घटनेनंतर आम्ही इशांशुला दादाबाडी स्थित पारीख रुग्णालयात घेऊन गेलो. त्याला स्ट्रेचरवरून आत नेण्याचा प्रयत्न केला. पण तेथील कर्मचाऱ्यांनी त्याला दाखल करवून घेण्यास नकार दिला. त्यांनी उपचार करण्यास स्पष्ट नकार दिला. वेळीच उपचार मिळाले असते, तर कदाचित तो वाचण्याची शक्यता वाढली असती.
पारीख रुग्णालयाचे डॉक्टर के के पारीख म्हणाले - विद्यार्थ्याला गंभीर स्थितीत येथे आणण्यात आले होते. त्याचे डोके फुटले होते. आमच्या रुग्णालयात न्यूरो सर्जनची व्यवस्था नव्हती. त्यामुळे आम्ही त्याला योग्य उपचार मिळण्यासाठी हायर हेल्थ इंस्टीट्यूटमध्ये पाठवले.
5 दिवसांपूर्वी एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येचा प्रयत्न
कोटाच्या विज्ञान नगरात गत 5 जानेवारी रोजी एका कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली होती. त्याला गंभीर स्थितीत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचे एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आले होते.
पोलिसांनी सांगितले होते की, हा 17 वर्षीय विद्यार्थी महाराष्ट्राचा आहे. तो गत सिटी मॉलच्या मागील रस्ता क्रमांक 2वरील एका हॉस्टेलमध्ये राहत होता. मागील 14 महिन्यांपासून तो कोटात राहून JEE ची तयारी करत होता. त्याच्या जबड्यासह कमरेखाली जबर मार लागला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.