आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुझ्याशिवाय राहू शकत नाही... हे स्टेटस मोबाईलवर लिहून 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने स्वतःवर गोळी झाडल्याची घटना घडली आहे. प्रेयसीचे लग्न झाल्याने तो तणावात होता. यातच त्याने हे टोकाचे पाऊल उचल्याची माहिती आहे. स्वत:च्या डोक्यात गोळी झाडतानाची घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे. ही घटना गुरुवारी रात्री 11 वाजता भिलवाडा शहरातील आहे.
आई, मित्र आणि प्रेयसीसाठी तीन स्टेट्स शेअर केले होते. रुग्णालयासमोर त्यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली. तरुणाचे नाव यश असून तो 17 वर्षांचा आहे. करोई पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मेघरस गावातील तो रहिवासी आहेत.
सीओ सीटी नरेंद्र दायमा यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास महात्मा गांधी रुग्णालयात एका तरुणाने स्वत:वर गोळी झाडल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिस अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. तरुणाने ज्या ठिकाणी गोळी झाडली तेथून 50 मीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. त्यांनी पुढे सांगितले की, तरुणाच्या प्रेयसीचे नुकतेच लग्न झाले होते. तेव्हापासून तो तणावात होता.
स्वत:वर गोळी झाडण्याच्या 7 तास आधी व्हॉट्सअॅपवर तीन स्टेटस शेअर केले
आईसाठी पहिला स्टेटस- पुढच्या जन्मी आई मी तुझ्याच पोटी जन्म घ्यावा आणि मी कोणत्याही मुलीच्या प्रेमात पडू नये ही माझी शेवटची इच्छा आहे. आई तुझ्यावर माझं खुप प्रेम आहे. मला माफ कर.
मित्रांसाठी दुसरे स्टेटस - पुढच्या आयुष्यातही तुमच्यासारखेच मित्र मिळावेत.
गर्लफ्रेंडसाठी तिसरे स्टेटस - यश व्यास ला कधीही विसरू नको. तुझ्याशिवाय जगू शकत नाही आणि इतर कोणाच्याही सोबत राहताना पाहू शकत नाही. म्हणूनच मी हे पाऊल उचलत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.