आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजस्थानमधील पाली जिल्ह्यातील बोमड्डा गावाजवळ सूर्यनगरी सुपरफास्ट ट्रेन रुळावरून घसरली. रेल्वेचे 3 डबे पलटले आहेत. तर 11 डबे रुळावरून घसरले. ही घटना सोमवारी पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात सद्या जीवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान या दुर्घटनेत 4 स्काऊट विद्यार्थ्यांसह 24 प्रवासी जखमी झाले आहेत. रेल्वे, पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले आहेत. अपघाताच्या कारणाचा शोध घेण्यात येत आहे. अपघातामुळे प्रवाशी होरपळे असून ट्रेनमधून सामान बाहेर काढून ते रुळांवरून पायी निघाले आहेत.
आता अपघात कधी झाला घ्या जाणून
सूर्यनगरी एक्स्प्रेस वांद्रे (मुंबई) येथून जोधपूरकडे जात होती. सोमवारी पहाटे 2.48 वाजेच्या सुमारास मारवाड जंक्शनला एक्सप्रेस पोहोचली.येथून एक्सप्रेस 3:09 वाजता पालीकडे जाण्यासाठी निघाले. त्याच दरम्यान बोमाद्रा गावाजवळ हा अपघात झाला. ट्रेनचे S3 ते S5 क्रमांकाचे डब्बे पूर्णपणे उलटले गेले. अपघात झाला त्यावेळी बहुतांश प्रवाशी झोपेत होते. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये एका महिलेची प्रकृती गंभीर असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. या एक्सप्रेसला एकूण 26 डबे होते.
ट्रेनमध्ये 150 स्काऊट गाईडही होते
ट्रेनमध्ये 150 पेक्षा जास्त स्काऊट गाईड असल्याचे सांगण्यात येत आहे. जोधपूर येथे होणाऱ्या जंबोरीसाठी ते जात होते. अपघाताची माहिती मिळताच स्काऊटचे गोविंद मीना, जितेंद्र भाटी यांच्यासह अनेक अधिकारी दाखल झाले.
या घटनेनंतर रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक जारी केला
ट्रेनच्या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाच्या वतीने हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे. यामध्ये जोधपूरसाठी लोक 0291-2654979 (1072), 0291-2654993, 0291-2624125, 0291-2431646 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. तर पाली मधील लोक 0293-2250324 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. यासोबतच उत्तर पश्चिम रेल्वेने जोधपूर मार्गावरील 12 गाड्यांचा मार्ग वळवला आहे.
या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.