आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोशल मीडियावर एका लग्नाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या लग्नात बॅंडबाजा आहे, वऱ्हाडी मंडळी देखील आहेत.रितीरिवाजाप्रमाणे येथील सोहळा देखील पार पडला. पण या लग्नातील महत्त्वाचा पाहुणा म्हणजे नवरदेव प्रत्यक्ष दिसलाच नाही. कारण या विवाहातील वधूने चक्क मंदिरातील भगवान विष्णूंशी विवाह करून त्यांना आपला पती मानले आहे. ही घटना जयपूरच्या गोविंदगडपासून काही अंतरावर असलेल्या नरसिंहपूरा गावात घडली. मात्र, कलियुगातील या मीराला पाहून लोक देखील थक्क झाले आहेत. तिची सर्वत्र चर्चा होवू लागली आहे.
कलियुगातील मीराबाईंना पाहून लोक आश्चर्यचकित
'मेरा तो गिरधर गोपाल दूसरा ना कोई.... हे वाचून मीराबाईंची आठवण येते. कृष्णाची भक्त मीरा हिने कृष्णाला आपले सर्वस्व मानले होते. समाज, घर, कुटुंब सगळं सोडून मीरा श्रीकृष्णाच्या नामस्मरणात तल्लीन झाली होती. मीराची भक्ती आजही सर्वांना आठवते. आता कलियुगातही मीरासारखी विष्णूभक्त सापडली आणि तिने भगवान विष्णूंशी विवाह रचला आहे. त्यामुळे कलियुगातील मीरा म्हणजे पूजाची चर्चा होवू लागली आहे.
पूजा सिंहने 8 डिसेंबर रोजी केले लग्न
पूजा सिंहने (20) ही जयपूरमधील गोविंदगढजवळील नरसिंगपुरा गावातील रहिवासी आहे. पूजा सिंहने भगवान विष्णूसोबत लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले. 8 डिसेंबर रोजी पूजा सिंहने भगवान विष्णूशी लग्न केले आणि तिची मागणी पूर्ण केल्यानंतर ती आनंदी झाली.
लग्नानंतर कोणी टोमणे मारत नाही, म्हणून घेतला निर्णय
नववधू पूजा सिंह म्हणाली की, लोकांच्या टोमणेने तिला त्रास झाला होता. तिला कोणासोबतही लग्न न करण्याचा निर्णय़ तीने यापूर्वीच घेतला होता. पती-पत्नीचे भांडण पाहून आपण लग्न करणार नाही असे तिला वाटले होते, पण समाजातील लोक तिला टोमणे मारू लागले. हे टोमणे टाळण्यासाठी पूजा सिंहने त्यावर उपाय शोधला आणि चक्क भगवान विष्णूंसोबत लग्न केले.
आयुष्य खराब होऊ नये म्हणून अशा वराची निवड केली
पूजा सिंह म्हणते की, मी 30 वर्षांची आहे. साधारणपणे 20 ते 25 वर्षे वयाच्या मुलींचे लग्न लावले जाते. माझ्या घरातही लग्नाची चर्चा सुरू झाली. विविध पाहुणे मंडळी देखील येवू लागली. लोक माझ्या आई वडिलांना सांगू लागले की, आता त्यांच्या मुलीचे लग्न करा, पण माझे मन यासाठी तयार नव्हते. मी माझ्या लहानपणापासून पाहत आले की, पती-पत्नीमध्ये अगदी किरकोळ गोष्टीवरून भांडणे होतात. वादात त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त व्हायचे आणि स्त्रियांना यात खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले.
तुळशी विवाहाबाबत ऐकून घेतलेला निर्णय
पूजा सिंह सांगते की, मी जसजसी मोठी होत गेले. तसे मी लग्न न करण्याच्या निर्णयावर ठाम होते. मी माझ्या आई वडिलांना आधीच सांगितले होते की, मला लग्न करायचे नाही, मध्येच काही मुलं पण बघायला आली, एक-दोनदा नातं कसं तरी पुढे ढकललं गेलं, दरम्यान तुळशीविवाहाबद्दल ऐकून मी ठरवलं. माझ्या आजोबांच्या घरीही एकदा पाहिलं होतं. विचार केला की, जेव्हा ठाकुरजी तुळशीजींशी लग्न करू शकतात. तर मी ठाकुरजीशी का लग्न करू शकत नाही.
देवाला माझा नवरा म्हणून स्वीकारले
पूजा सिंह सांगते की, मी पंडितांना याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी असेही सांगितले की, असे होऊ शकते. यानंतर, आईशी संवाद साधला. सुरुवातीला तिने देखील विरोध केला. पण नंतर होकार दिला. जेव्हा आम्ही माझ्या वडिलांना सांगितले तेव्हा ते रागावले आणि स्पष्टपणे नकार दिला. नाराजीमुळे वडीलही या लग्नाला आले नाहीत. समाजाने माझी चेष्टा केली, पण मी देवाला माझा नवरा म्हणून स्वीकारले आहे. समाजातील अनेकांनी पाठिंबाही दिला आणि अनेकांनी माझी खिल्लीही उडवली, पण फिकीर नसल्याची खंत देखील व्यक्त केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.