आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राजस्थान:तलाव खोदला, शेतात कुंपण घातले; परिणाम- खडकाळ जमीन बहरली, ग्रामस्थांनी लावली 12 हजार रोपटी

बारांएका महिन्यापूर्वीलेखक: एकनाथ पाठक
  • कॉपी लिंक
  • जमिनीतील पाणीपातळीही वाढली, डार्कमधून ग्रीन झोनमध्ये आले कुंजेड गाव
Advertisement
Advertisement

राजस्थानातील बारां जिल्ह्यातील गाव कुंजेड. ५ हजार लोकसंख्या असलेले हे गाव चार वर्षांपूर्वी डार्क झोनमध्ये होते. सगळी जमीन खडकाळ झाली होती. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना खूप संघर्ष करावा लागत होता. अशात तत्कालीन सरपंच प्रशांत पाटनी जैन यांनी संकल्प केला आणि मोहीम यशस्वी करण्यात लागले. त्यांनी अनेक तज्ञांशी चर्चा केली असता सर्वांनी सांगितले की, पावसाच्या पाण्याची बचत केल्यास गावाचे संकट दूर होईल. मग काय, प्रशांत जैन यांनी गावातील लोकांना ही गोष्ट समजावली आणि पूर्ण गाव या कामाला लागले. 

खडकाळ जमिनीवर वृक्षारोपण करण्यात आले आहे.

महिलांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. मोहिमेद्वारे गावातील तलाव खोल केले. पावसाचे पाणी साठवण्यासाठी नाले खोदले. आज अशी स्थिती आहे की गावातील पाणी पातळी वाढली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचे संकट टळले आहे. दरम्यान, ४०० एकर ओसाड डोंगराळ आणि अतिक्रमित जमिनीवर १२ हजार वृक्षांचा बगीचा फुलवण्यात आला आहे. गाव आता ग्रीन झोनमध्ये आले आहे.

Advertisement
0