आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rajasthan's Jaipur Private Hospital Rape Case Update | Crime Against Women In Rajasthan

ICU मध्ये महिलेवर बलात्कार:व्हेंटीलेटरवर होती महिला, तोंडावर ऑक्सीजन मास्क आणि हात बांधले होते; वार्ड बॉयकडून रात्रभर अश्लील चाळे

जयपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी - Divya Marathi
आरोपी
  • याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

राजस्थानची राजधानी जयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका खासगी हॉस्पीटलच्या अतिदक्षता विभागात(ICU)भरती असलेल्या महिलेवर वॉर्ड बॉयने बलात्कार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वॉर्ड बॉयला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकरण जयपुरमधील शैल्बी रुग्णालयातील आहे. या रुग्णालयात ऑपरेशन झाल्यानंतर पीडित महिलेला आयसीयूत ठेवण्यात आले होते. सोमवारी रात्री येथील एका वॉर्ड बॉयने महिलेसोबत रात्रभर अश्लील चाळे केले. आरोपी जेव्हा घृणास्पद कृत्य करत होता, तेव्हा महिलेच्या तोंडावर ऑक्सीजन लावले होते आणि तिचे हातही बांधले होते. यामुळे महिलेला विरोध करता आला नाही. याप्रकरणी महिलेच्या पतीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नवीन कायद्यानुसार, अश्लील चाळेही बलात्कारात मोडतात

आरोपीने महिलेसोबत रात्रभर अश्लील चाळे केले, पण त्याच्यावर बलात्काराचाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीतील निर्भया केसनंतर कायद्यात बदल करण्यात आले आहेत. आता चुकीच्या पद्धतीने हात लावणे किंवा छेडछाड किंवा लैंगिक शोषणालाही बलात्कारच मानले जाते.

याबाबत डीसीपी प्रदीप मोहन शर्मा म्हणाले की, प्रकरण खूप गंभीर आहे. पीडित महिलेच्या पतीने चित्रकूट पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. घटनास्थळावर दाखल झालेल्या पोलिसांच्या टीमने ड्यूटी चार्ट आणि CCTV कॅमेऱ्यांच्या मदतीने पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेतील मुख्य आरोपी खुशीरामला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...