आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रख्यात चित्रकार राजा रवी वर्मा यांनी १८९४ मध्ये लक्ष्मीमातेचे चित्र तयार केले होते. या चित्रासाठी राजा रवी वर्मांच्या मॉडेल होत्या मुंबईच्या राजीबाई मुळगावकर. या चित्राचा ओलियोग्राफ तयार झाला. त्यानंतर देशभरात कॅलेंडर, फटाक्यांसह अनेक उत्पादनांवर लक्ष्मीच्या रूपात राजीबाईंचा फोटो छापण्यास सुरुवात झाली. लक्ष्मीचेच नाही तर अहिल्यादेवींच्या चित्रासाठीही राजीबाईंनीच मॉडेल म्हणून राजा रवी वर्मांना पोज दिली होती. राजीबाई या लक्ष्मीच्या रूपात विनोलिया ब्रँडच्या साबणाच्या जाहिरातीत प्रथमच दिसल्या. ही माहिती राजा रवी वर्मा यांच्यावरील नव्या पुस्तकात देण्यात आली आहे. वडोदराच्या राजमाता शुभांगिनी देवी, महाराणी राधिकाराजे यांनी २००० पानांच्या ग्रंथमालेच्या पहिल्या खंडाचे लोकार्पण केले.
ग्रंथमालेसाठी ३० वर्षांपासून काम : महाराजा सयाजीराव यांच्या निमंत्रणावरून राजा रवी वर्मा १८८१ मध्ये वदोडऱ्याला आले होते आणि १९०६ पर्यंत राहिले. वर्मांच्या भारतीय संस्कृती-पौराणिक चित्रकथा व जीवनप्रवासावर सहा खंडात नवी ग्रंथमाला तयार झाली आहे. ग्रंथमालेसाठी बंगळुरूचे वकील-लेखक गणेश शिवास्वामी ३० वर्षांपासून काम करत आहेत. लेखिका रूपिका चावला यांच्या प्रेरणेने त्यांनी ग्रंथमाला लिहिण्यास सुरुवात केली. भारतीय चित्रपटसृष्टीचे भीष्म पितामह दादासाहेब फाळकेदेखील रवी वर्मांच्या स्टुडिओत थांबले होते. यादरम्यान त्यांनी अमर चित्रकथेच्या प्रिंट तयार करून घेतल्या. त्या वेळचे इतर प्रख्यात चित्रकार जी. व्ही. व्यंकटेशन, विश्वनाथ धुरंधर आणि के. मदवन यांची प्रिंटही राजा रवी वर्मांच्या स्टुडिओत तयार व्हायची. मात्र, ते ब्रँड रवी वर्मांच्या तुलनेत अधिक चमकू शकले नाही.
महाराजांचे चित्र असे तयार करत होते राजा रवी वर्मा
साधारणत: राजा रवी वर्मा हे मॉडेलला आपल्यासमोर बसवून चित्र काढत असत. तथापि, महाराजा आणि महाराणींचे चित्र काढायचे असल्यास ते छायाचित्राच्या आधार घेत चित्र काढत होते. कारण राजघराण्यातील सदस्य त्यांच्यासमोर अनेक तास बसू शकत नव्हते. तसेच त्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळही नव्हता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.