आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rajinikanth Came Into Politics Under The Pressure Of BJP, But Came Out Realizing That He Had No Place In The Political Arena!

राजकीय:रजनीकांत भाजपच्या दबावाखाली राजकारणात आले होते, पण राजकीय क्षेत्रात स्थान नसल्याचे जाणवल्याने बाहेर पडले!

चेन्नई / आर. रामकुमारएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अखेर तामिळनाडूतील सुपरस्टार रजनीकांत यांची माघार कशामुळे ?

सुपरस्टार रजनीकांत यांनी महामारी, आजारपणाचे कारण सांगून राजकारणापासून दूर राहणार असल्याचे स्पष्ट केले. रजनी मक्कल मंदरम हा राजकीय मंच फॅन क्लबच्या रूपाने सक्रिय राहणार आहे हे त्यांनी जाहीर केले आहे. यासंबंधी रजनी यांनी समर्थकांशी २० मिनिटांचा संवाद साधला. त्यांच्या बैठकीत उपस्थित एक वरिष्ठ सदस्य भास्करला म्हणाले, बैठकीदरम्यान रजनीकांत अनेक वेळा भावुक झाले हाेते. राजकारण प्रवेशापासून यू-टर्न घेण्याच्या निर्णयामुळे व्यथित झालाे आहे. वेदना अनुभवताेय. राजकारणाबाबतचे विचार मात्र अद्याप बदललेले नाहीत. म्हणूनच या फाेरमला विसर्जित केले जात आहे. रजनीकांत यांनी आजारपणाबद्दलची माहिती दिली. उपचाराच्या दृष्टीने अमेरिकेचा दाैरा यशस्वी राहिल्याचे त्यांना सांगितले. परंतु धाेका पूर्णपणे टळलेला नसल्याचे त्यांनी नमूद केले.

तामिळ समाजासाठी निवडणूक लढणे किंवा प्रचार करण्यासाठी भलेही प्राण देण्याची वेळ आली तरी देण्यास तयार आहे, परंतु तसे झाल्यास राजकीय प्रवासात येणारे लाेक बळीचा बकरा ठरतील. त्यावरून माझ्यावर टीकाही झाली. मात्र अखेर सर्वांच्या भल्याचा विचार करून हा निर्णय घेतला. राजकीय विश्लेषक रंगराजन म्हणाले, भाजपने द्रविड भूमीवरील राजकीय लाभासाठी रजनी यांच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली हाेती. गेल्या तीन वर्षांत त्यांना आपल्याला राजकीय क्षेत्रात स्थान नसल्याची जाणीव झाली हाेती. म्हणूनच त्यांनी आजारपणाचे कारण सांगून माघार घेतली.

राजकीय वादळाला टाळायचे हाेते म्हणून आराेग्याचे कारण
राजकीय विश्लेषक राजशेखर म्हणाले, २०१६ मध्ये रजनीकांत यांच्यावर किडनी प्रत्याराेपण झाले हाेते. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेशाची घाेषणा केली हाेती. नवी दिल्लीतील सत्ताकेंद्राचा मुकाबला करण्यासाठी एका अभिनेत्याचे रणनीतीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल म्हणून आम्ही त्याकडे पाहिले. अपाेलाे रुग्णालयाचे मेडिकल बुलेटिन असामान्य हाेते. कारण त्यातून त्यांच्या आराेग्यासंबंधीचा बराच तपशील जाहीर झाला हाेता. डाॅक्टरांनी त्यांना काेणत्याही घडामाेडींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला हाेता. कारण त्यातून काेविड-१९ ची जाेखीम वाढू शकते. राजकीय वादळापासून त्यांना दूर राहायचे हाेते. म्हणूनच त्यांनी आराेग्याचे कारण पुढे केले आहे.

बातम्या आणखी आहेत...