आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rajinikanth's Entry In Politics : To Form Political Party, Will Also Contest Assembly Elections In 2021

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रजनीकांत यांची राजकारणात एंट्री:31 डिसेंबर रोजी करणार पक्षाची घोषणा, 2021च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार उतरवणार

चेन्नई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रजनीकांत गेल्या काही महिन्यांपासून राजकारणात सक्रिय आहेत

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तसेच 2021 च्या विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचीही घोषणा केली. 31 डिसेंबर रोजी पक्षाविषयी औपचारिक घोषणा केली जाईल, असे रजनीकांत यांनी गुरुवारी सांगितले.

रजनीकांत गेल्या काही महिन्यांपासून राजकारणात सक्रिय आहेत, मात्र पहिल्यांदाच राजकीय वाटचालीसाठी त्यांनी आपली पत्ते उघडले आहेत. रजनीकांत यांनी पक्षाच्या स्थापनेची आणि विधानसभा निवडणुका लढलवण्याची घोषणा केल्यानंतर तामिळनाडूच्या राजकारणात आणखी एका अभिनेत्याचा प्रवेश होणार आहे. यापूर्वीही तमिळनाडूच्या राजकारणात अनेक चित्रपट कलाकार यशस्वी झाले आहेत.

वर्षभरापूर्वी कमल हासनशी युती करण्याबद्दल वक्तव्य केले होते

रजनीकांत यांनी मागील वर्षी अभिनेता कमल हसन यांच्यासोबत युती करणार असल्याचे बोलले होते. राज्यातील जनतेचे हित लक्षात घेऊन जर कमल हासन यांच्याशी युती करण्याची परिस्थिती निर्माण झाली असेल तर ते नक्कीच एकमेकांसोबत येतील, असे रजनीकांत यांनी म्हटले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser